राम चरणचे विमानतळावर जल्लोषात स्वागत!

17 Mar 2023 13:19:33
मुंबई,  
एसएस राजामौली यांचा 'आरआरआर' Ram Charan चित्रपट जगभर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटातील 'नाटू- नाटू' या गाण्याने ऑस्कर जिंकून देशाचा गौरव केला आहे. अलीकडेच चित्रपटाचा अभिनेता रामचरण दिल्ली विमानतळावर पोहोचला, जिथे देशाचा मान वाढवून त्यांचे अतिशय खास पद्धतीने स्वागत करण्यात आले. भारताने जगातील सर्वात मोठ्या पुरस्कार सोहळ्यात दोन ऑस्कर जिंकले. सर्वप्रथम, गुनीत मोंगा यांच्या 'द एलिफंट व्हिस्पर्स' या लघुपटाला पुरस्कार मिळाला. त्यानंतर 'RRR' मधील 'नाटू- नाटू' या गाण्याने जगभर आपल्या यशाची मोहोर उमटवली.
 
ghy
 
 
राम चरणचा Ram Charan एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अभिनेता लॉस एंजेलिसहून भारतात परतला आहे. चाहत्यांनी त्याचं जल्लोषात स्वागत केलं. यादरम्यान राम चरण यांनीही मीडियाशी संवाद साधला आणि सांगितले की, मी खूप आनंदी आहे. आमच्या आनंदाचे श्रेय एसएस राजामौली, एमएम कीरावानी आणि चंद्रबोस यांना जाते, त्यांच्या कठोर परिश्रमामुळे आम्ही हा दिवस पाहू शकलो. राम चरण पुढे म्हणाले, 'RRR' चित्रपट पाहिल्याबद्दल आणि 'नाटू- नाटू' ला दिलेल्या प्रेमाबद्दल मी सर्व चाहत्यांचा आभारी आहे. कलाकार म्हणून आम्ही शूटिंग करत असताना या गाण्याची क्रेझ एवढी वाढेल असं कधीच वाटलं नव्हतं. आज हा आमचा चित्रपट नाही. हे आमचे गाणे नाही. ते लोकांचे गाणे बनले आहे. त्यामुळे ऑस्करसाठी एक नवा मार्ग मिळाला आहे. याआधी १५ मार्चला ज्युनियर एनटीआर अमेरिकेतून परतले होते. हैदराबाद विमानतळावर शेकडो चाहत्यांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले. त्यांची पत्नी लक्ष्मी प्रणती विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यासाठी आली होती. यादरम्यान ज्युनियर एनटीआरने मीडियाशी बोलताना ऑस्कर मिळणे हा त्याच्या आयुष्यातील सर्वोत्तम काळ असल्याचे सांगितले होते.
Powered By Sangraha 9.0