खेळाडूंनी जनभावनांची कदर करावी !

sports क्रीडा क्षेत्रातील उज्ज्वल भविष्यासाठी तरतूद

    दिनांक :17-Mar-2023
Total Views |
वेध
 
- मिलिंद महाजन 
sports जागतिक स्तरावरील क्रीडा क्षेत्रात भारताचा तिरंगा सदैव फडकत राहावा, या उद्देशाने भारतीय खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे सरकार सदैव प्रयत्नशील आहे. sports भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई), राष्ट्रीय क्रीडा संस्थान (एनआयएस) यासारख्या संस्थांच्या माध्यमातून केंद्र सरकार अव्वल दर्जाचे तसेच उदयोन्मुख प्रतिभावान खेळाडूंना प्रोत्साहन देत आहे. त्यांना जागतिक दर्जाचे खेळाडू म्हणून घडविण्यासाठी योग्य ते प्रशिक्षण देत आहे. sports केंद्र सरकारने ऑलिम्पिक, जागतिक क्रीडा स्पर्धा, राष्ट्रकुल व आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी खेळाडूंना पुरेसा व योग्य आहार मिळावा, त्यांचे आरोग्य उत्तम राहावे तसेच उच्च दर्जाचे प्रशिक्षण लाभावे याकरिता विदेशी प्रशिक्षकांची नियुक्ती केली आहे तसेच खेळाडूंना विदेशात जाऊन प्रशिक्षण मिळण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. sports केवळ प्रशिक्षणच नव्हे, तर खेळाडूंना स्पर्धात्मक अनुभव मिळण्यासाठी विदेश दौ-याचेही आयोजन सरकारतर्फे करण्यात येते. sports शिवाय खेळाडूंसोबत त्यांच्या प्रशिक्षकांना नेण्याची मुभा सरकार देते व त्यांचा प्रवासखर्चही करते.
 

sports 
 
sports टार्गेट ऑलिम्पिक पोडियम (टॉप्स) योजनेसाठी २०२३-२४ या वर्षासाठी केंद्र सरकारने क्रीडा खात्याला विक्रमी ३३९७ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे. गतवर्षीच्या आर्थिक तरतुदीच्या तुलनेत यात ११ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. देशाच्या क्रीडा क्षेत्रातील उज्ज्वल भविष्यासाठी केलेली ही तरतूद आहे, याचे खेळाडूंनी भान ठेवायला हवे. या क्रीडा सोयी-सुविधांचा लाभ बॅडमिंटन, हॉकी, कयाकिंग, टेबल टेनिससारख्या विविध खेळाचे खेळाडू घेत आहेत. sports कुस्तीपटूंनाही मिळत आहे. परंतु अखिल भारतीय कुस्ती महासंघाचे तत्कालीन अध्यक्ष ब्रजभूषण शरणसिंह यांच्याविरोधात लैंगिक छळ केल्याचा आरोप देशातील काही अव्वल कुस्तीपटूंनी केला व जानेवारी महिन्यात जंतर-मंतरसमोर कुस्तीपटूंनी आंदोलन केले. जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत कोणत्याही आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत भाग घेण्यास नकार दिला. sports गत फेब्रुवारी महिन्यात झॅगरेब येथे आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतून अव्वल कुस्तीपटू विनेश फोगट, रवी दहिया, दीपक पुनिया, अंशू मलिक, संगीता फोगट व संगीता मोर यांनी माघार घेतली. sports त्यानंतर अलेक्झांड्रिया, इजिप्त येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेतही न खेळण्याचा निर्णय या अव्वल खेळाडूंनी घेतला.
 
 
sports खेळाडूंनी न्याय मिळावा, यासाठी अशी भूमिका घेणे योग्य नाही. खेळाडूंना तर न्याय मिळायलाच हवा व न्याय मिळेलही. या प्रकरणाचे परिणाम संंबंधितांवर होतही आहेत, त्यामुळे ब्रजभूषण शरण सिंह यांना तात्पुरते का होईना, अ. भा. कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदावरून हटविण्यात आले आहे. sports या प्रकरणाचा तपास करण्यासाठी केंद्र सरकारने विश्वविजेती महिला मुष्टियोद्धा व विद्यमान खासदार एम. सी. मेरी कोम हिच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली. समितीचे कार्य व्यवस्थित, पारदर्शी व निष्पक्षपणे व्हावे, यासाठी या समितीतील सदस्यपदी काही कुस्तीपटूंचा समावेश केला आहे. sports चौकशीचा अहवाल सादर करण्यासाठी अलिकडेच सरकारने समितीला मुदतवाढ दिली आहे.
 
 
या प्रकरणाची चौकशी सुरू असताना कुस्तीपटूंनी आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत भाग न घेणे कितपत योग्य आहे? चौकशीअंती दोषींवर योग्य ती कारवाई होईलच; परंतु या कुस्तीपटूंच्या प्रशिक्षणावर केंद्र सरकारने आतापर्यंत केलेल्या खर्चाचे काय? sports खेळाडूंच्या भावनांचा आदर निश्चितच व्हायला पाहिजे, परंतु खेळाडूंनीही आपल्या देशवासीयांच्या भावनांची कदर करायला हवी. sports ऑलिम्पिक, जागतिक म्हणा किंवा राष्ट्रकुल व आशियाई स्पर्धेत जेव्हा भारतीय खेळाडू सुवर्ण, रौप्य, कांस्यपदके जिंकतात, तेव्हा संपूर्ण भारतीयांना याचा आनंद होतो, अभिमान वाटतो.
७२७६३७७३१८