वॉटर फूटप्रिंट आणि अन्नसुरक्षा !

water footprint आपण काय खातो हे महत्त्वाचे

    दिनांक :17-Mar-2023
Total Views |
इतस्ततः 
- विनोद हांडे
 
water footprint पाण्याच्या क्षेत्रात काम करणा-या व्यक्ती असो किंवा संस्था त्यांच्या लेखनात किंवा भाषणात ‘वॉटर फूटप्रिंट'चा विषय चर्चिला जातो. प्रत्येक व्यक्तीचे आपले वेगळे वॉटर फूटप्रिंट असते. ते त्यांच्या खानपानाच्या सवयींवर अवलंबून असते. जितके तुमचे खाण्याचे प्रकार व प्रमाण अधिक तितके तुमचे वॉटर फूटप्रिंट मोठे. सोपा नियम म्हणजे मोठे वॉटर फूटप्रिंट म्हणजे तुमच्या खाद्यपदार्थाला लागणारा पाण्याच्या मोठा वाटा. म्हणजेच आपण जास्त ‘पाणी खातो'. water footprint पृथ्वीवरील पाण्याचे साठे आणि अन्नसुरक्षा यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. आपण आपल्या रोजच्या खाण्याच्या सवयीप्रमाणे २००० ते ५००० लिटर ‘पाणी खातो' असे जाणकार सांगतात. water footprint हे इथे खाण्याच्या पदार्थांवरच सीमित नसून आपण जे जे काही घालतो, खरेदी करतो, विकतो या सगळ्या वस्तूंच्या निर्मितीला पाणी लागते. water footprint थोडक्यात वॉटर फूटप्रिंट आम्ही वापरत असलेल्या प्रत्येक वस्तू आणि सेवांच्या निर्मितीसाठी वापरल्या जाणा-या पाण्याचे प्रमाण मोजते. water footprint वॉटर फूटप्रिंटचा आकडा वस्तूच्या उत्पादनात वापरल्या गेलेल्या पाण्याचा आणि पाणी दूषित करण्याचा आकडा दर्शवितो.
 
 
fp
 
water footprint वॉटर फूटप्रिंट संकल्पनेचे जनक आहेत प्रा. अर्जेन वाय होक्स्ट्रा. या वॉटर फूटप्रिंटमध्ये उत्पादनासाठी लागणारे पाणी आणि दूषित झालेल्या पाण्याचा समावेश असतो. आपल्या गोड्या पाण्याच्या स्त्रोतांचा वापर कोणत्या उद्देशाने केला जातो आणि प्रदूषित करतो हे समजावून घेण्यात वॉटर फूटप्रिंट ही संकल्पना आम्हाला मदत करते. water footprint पाणी कोठून आणि केव्हा घेतले यावर त्याचे परिणाम अवलंबून असतात. प्रा. अर्जेन वाय होक्स्ट्रा म्हणतात, पाणी समस्या अनेकदा या जागतिक अर्थव्यवस्थेच्या रचनेशी संबंधित असतात. बरेचसे देश इतर ठिकाणाहून पाणी केंद्रित वस्तू आयात करून त्यांच्या पाण्याचे ठसे वाढवतात. यामुळे निर्यात करणाèया प्रदेशातील जलस्त्रोतांवर दबाव पडतो. water footprint उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार जागतिक स्तरावर दरडोई वॉटर फूटप्रिंटचे प्रमाण दररोज ३.८ टन इतके आहे. अमेरिकेचा दरडोई वॉटर फूटप्रिंट आहे ६.८ टन रोज. युरोपियन देश जसे ग्रीस, इटली आणि स्पेन यांचा वॉटर फूटप्रिंट आहे ६.५ टन प्रतिव्यक्ती रोज. भारताचा दरडोई वॉटर फूटप्रिंट आहे ९८० क्युबिक मीटर जो जागतिक सरासरी १२७३ पेक्षा क्युबिक मीटरपेक्षा कमी असला, तरी जगात पाणी वापरातल्या टक्केवारीत आपण अग्रेसर आहोत.water footprint
 
 
इतक्या मोठ्या संख्येत पाण्याचा वापर असूनसुद्धा ६३ दशलक्ष नागरिक स्वच्छ पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत, हे २०१७ चे आकडे दर्शवितात. वॉटर फूटप्रिंट तीन प्रकारचे असतात- ग्रीन, ब्ल्यू आणि ग्रे. ग्रीन वॉटर फूटप्रिंट हे शेती, बागायती आणि वन उत्पादनासंबंधित असते जिथे पावसाचे पाणी पिकांच्या मुळात शोषल्या जाते किंवा  त्यांचे बाष्पीभवन होते. ग्रे वॉटर फूटप्रिंट ही दूषित पाण्याची मात्रा असते जी वस्तूच्या उत्पादनादरम्यान निर्मित होते. water footprint आपले खानपान, राहण्याच्या सवयी, आपली जीवनशैली इत्यादींवर आपले वॉटर फूटप्रिंट अवलंबून असते. थोडक्यात माणूस जसजसा श्रीमंत होतो तसेतसे त्याचे वॉटर फूटप्रिंट मोठे होत जातात. शुद्ध पाण्याची उपलब्धता बघता हे निश्चितच चिंतेचे कारण आहे. water footprint १ किलो चिकनकरिता ४३३० लिटर ताजे पाणी लागते, १ डझन केळी उत्पादनाकरिता १९२० लिटर, १ किलो साखरेकरिता १८०० लिटर, १ लिटर दुधाकरिता १००० लिटर, ५०० मिलि. सॉफ्टड्रिंककरिता १७०-३१० लिटर, १०० ग्रॅम चॉकलेटकरिता १७०० लिटर्स, १ किलो ब्रेडकरिता १६०० लिटर्स, सगळ्यांचा आवडता पिझ्झा १२६० लिटर्स, १ किलो लोणी ९४० लिटर्स, १ किलो तांदूळ २५०० लिटर्स, एक अ‍ॅपल १२५ लिटर्स तर एक कॉफीसाठी १३२ लिटर्स एवढे पाणी लागते. आपला आवडता पेहराव टी-शर्ट आणि जीन्ससाठी १० हजार लिटर्स व स्मार्टफोन १२७६० लिटर्स एवढे पाणी लागते. water footprint
 
 
water footprint वरील माहितीच्या आधारे आपण आपले वॉटर फूटप्रिंट तपासू शकतो आणि ते कमी करायचे प्रयत्न पण करू शकतो तसेच जास्त पाणी पिणारे पीक न घेता कमी पाणी लागणा-या पिकांचा विचार करू शकतो; पण तसे होत नाही. पैसा हातात आला की, साहजिकच त्याचे परिणाम आपल्या राहणीमान आणि खाण्यापिण्याच्या पद्धतीवर होतो आणि पर्यावरणावर त्याचा कसा परिणाम होतो, त्याकरिता चीनचे उदाहरण देणे निश्चितच उद्बोधक ठरेल. water footprint ही १९७८ सालची गोष्ट आहे. चीनमधील पुष्कळ लोक श्रीमंत होऊ लागले. लगेच त्यांच्या खाण्यात अंडी, चीझ, दूध, ताजी फळे आणि चांगल्या भोजनाचा समावेश झाला. जेवणात मांसाहारी पदार्थांचाही समावेश झाला. कोंबड्या आणि इतर जनावरांसाठी त्यांना जास्त धान्याची गरज भासू लागली. एक किलोग्राम चिकन हवे असेल तर त्याकरिता दोन किलो धान्य लागते. water footprint एक किलोग्राम पोर्ककरिता चार किलो धान्य लागते. या वाढत्या धान्याच्या मागणीकरिता चीनने स्वतः ते उगवावे किंवा ते आयात करावे. स्वतः उगवले तर शेतजमीन जास्त लागणार, पाणी जास्त लागणार, मग ते एका पाठोपाठ सगळे आलेच. water footprint चीन हे औद्योगिक देश असल्यामुळे शेत जमीन कमी आहे. म्हणजेच चीनला धान्य आयात करणे आलेच.
 
 
चीनच्या स्वस्थ आहार पद्धतीप्रमाणे प्रत्येक माणसाने वर्षाला २०० अंडी खायला हवी असा अंदाज. water footprint इतक्या जणांना अंडी उपलब्ध करायला त्यांना १.३ बिलियन कोंबड्या लागतील आणि इतक्या कोंबड्यांच्या आहाराकरिता २४ मिलियन टन धान्याची गरज भासेल. इतक्या प्रचंड प्रमाणात धान्य आयात केले तर जागतिक स्तरावर धान्याची भाववाढ निश्चित. १९९३ साली चीनने धान्य आयात न करता २१०० टन मांस आयात केले होते. water footprint प्रश्न हा आहे की, चीन इतक्या प्रचंड संख्येत धान्य उत्पादन करो वा आयात करो, त्याचा ताण कुठे ना कुठे शेतजलानीवरच पडतो. आपले वॉटर फूटप्रिंट वाढीचे कसे व कुठंपर्यंत परिणाम होतात त्याकरिता चीनचे उदाहरण योग्य असे वाटते. भारताची स्थिती काही वेगळी असेल, असे वाटत नाही. कारण शेतजमीन आणि जंगलांची जागा आता काँक्रिट जंगलाने व्यापली आहे. हा विषय इथेच संपत नाही तर पदार्थांच्या वाढत्या वॉटर फूटप्रिंट बरोबर त्यांच्या कार्बन फूटप्रिंटकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. water footprint वॉटर फूटप्रिंट मुळे आपण पाणी बचतीचा मार्ग शोधतो पण कार्बन फूटqप्रटचा परिणाम पर्जन्यमानावर होतो.
 
 
म्हणून प्रत्येकाने आपले कार्बन फूटप्रिंट कमी करण्याच्या उद्देशाने क्लायमेट-फ्रेंडली डायटची किंवा लो-कार्बन डायटची निवड करायला हवी; कारण आपण काय खातो हे महत्त्वाचे आहे. जाणकार सांगतात की, भारतीय शाकाहारी पद्धतीमध्ये एक माणूस ११६५ ग्रॅम अन्नाचे सेवन करतो आणि ७२३.७ ग्रॅम सीओ२ चे उत्सर्जन करतो. water footprint मांसाहारी जेवणाचे सीओ२ चे उत्सर्जन हे शाकाहारी पेक्षा १.८ पटीने जास्त असते. शरीराला हाय-प्रोटीन मिळावे म्हणून लोक दिवसातून चार-चार अंडी खातात. आपल्याला स्वस्थ राहायचे आहे तसेच या वसुंधरेला स्वस्थ ठेवायची जबाबदारी पण आपलीच आहे. एका मांसाहारी माणसाचे ग्रीन हाऊस गॅसचे उत्सर्जन ३.३ टन असते तर शाकाहारीचे १.५ टन. शिवाय शाकाहार पदार्थ उत्पन्न करायला मांसाहारापेक्षा अर्धे पाणी लागते. अमेझॉनची ७० टक्के जंगलतोड ही गुरेढोरे यांना जागा उपलब्ध करण्यासाठी वापरली जाते. मेंढ्यांचा खरा उपयोग हा वूल प्राप्त करण्याकरिता होतो, पण आता चित्र बदललेले आहे. water footprint वूलपेक्षा मेंढ्यांच्या मांसाकरिता मेंढ्यापालन सुरू आहे. हे पर्यावरणाच्या दृष्टीने वाईटच आहे. ग्रीन हाऊस गॅसचा उत्सर्ग कमी कसे करायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे. वाढत्या वॉटर फूटप्रिंटप्रमाणेच वाढते कार्बन फूटप्रिंट हेही काळजीचे कारण आहे. water footprint
९४२३६७७७९५