वर्सोवा येथून 500 लीटर भेसळयुक्त दूध जप्त

    दिनांक :18-Mar-2023
Total Views |
मुंबई, 
वर्सोवा चार बंगला या ठिकाणी असणार्‍या भारत नगर परिसरात गुन्हे शाखेने छापेमारी करून 500 लीटर Adulterated milk भेसळयुक्त दुधाचा साठा, भेसळ करण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. या परिसरात दुधात भेसळ करणारी टोळी कार्यरत असून, ही टोळी मागील काही वर्षांपासून नामांकित कंपन्यांच्या दुधात भेसळ करून मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त दुधाची विक्री करून नागरिकांच्या जीवाशी खेळत होती, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
 
 
Adulterated milk
 
रामलिंगया गज्जी आणि काटमय्या नरसिया पुलीपालूपुला असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या दोघांविरुद्ध अन्न व औषध भेसळ विरोधी कायदा तसेच फसवणूक इत्यादी कलमांतर्गत वर्सोवा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. प्राप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने अन्न व औषध प्रशासनासोबत शुक‘वारी पहाटे भारत नगर येथील एका घरात छापा टाकला. पोलिसांना बघून एक जण पळून जात असताना, त्याला ताब्यात घेण्यात आले. छापा टाकण्यात आलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोकुळ, अमूल या सार‘या नामांकित कंपन्यांच्या दुधाच्या भरलेल्या व अर्धवट भरलेल्या पिशव्या आणि Adulterated milk भेसळीसाठी लागणारे साहित्य आढळून आले. दरम्यान, दुसर्‍या आरोपीला दूध घरोघरी टाकताना ताब्यात घेऊन त्यालाही अटक करण्यात आली आहे.