‘कोम्बिंग ऑपरेशन’ दरम्यान फरार १६ आरोपींना अटक

18 Mar 2023 19:01:23
वाशीम, 
Combing Operation : समाजात शांतता व सुव्यवस्था नांदावी व कायद्याचे राज्य अबाधित राहावे यासाठी वाशीम जिल्हा पोलिस दलातर्फेसातत्याने कायदेशीर कारवाया केल्या असून, वेळोवेळी ‘कोम्बिंग ऑपरेशन’ सारख्या विशेष मोहिमा राबवून कायद्याचे उल्लंघन करणार्‍यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला जातो. त्यामुळे कायद्याचा वचक निर्माण होऊन समाजात शांतता प्रस्थापित होते. या ‘कोम्बिंग ऑपरेशन’ विशेष मोहीमे दरम्यान ५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपसून फरार असलेल्या ८ आरोपीसह एकूण १८ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
 
Combing Operation
 
पोलिस अधीक्षक बच्चन सिंह, यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली विशेष कोम्बिंग ऑपरेशन राबवून जिल्ह्यातील विविध पोलिस स्टेशनअंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यांतील ५ वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून पाहिजे/फरार असलेल्या ८ आरोपींसह एकूण १६ आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश प्राप्त झाले आहे. त्यामध्ये २ वर्षांपासून फरार/पाहिजे असलेले आरोपी संख्या ८ असूनन, ५ वर्षांपासून फरार असलेले आरोपी संख्या ४, ६ वर्षे, १० वर्षे, १२ वर्षे व १६ वर्षांपासून पाहिजे/फरार असलेल्या आरोपींची संख्या प्रत्येकी १ याप्रमाणे एकूण १६ आरोपींना राबविण्यात आलेल्या विशेष कोम्बिंग ऑपरेशन मोहिमेअंतर्गत अटक करण्यात आली आहे.
 
 
जिल्ह्यातील वाशीम, मंगरूळनाथ व कारंजा उपविभागातील प्रत्येक पोलिस स्टेशनअंतर्गत कोम्बिंग ऑपरेशन (Combing Operation) राबविण्यात येत असून, त्यादरम्यान पाहिजे आरोपी, निगराणी बदमाश, सराईत गुन्हेगार, शस्त्र अधिनियम कारवाया तसेच अवैध धंद्यांविरोधात कडक कायदेशीर कारवाई केली जात आहे. १३ मार्च २०२३ पासून सुरु असलेली हा विशेष कोम्बिंग ऑपरेशन मोहीम २१ मार्च पर्यंत सुरु राहणार असून, यापुढेही गुन्हे नियंत्रण व प्रतिबंधक कारवाईकरिता येणारे सण - उत्सव लक्षात घेता भविष्यातही अशा प्रकारच्या मोहिमा राबविल्या जाणार आहे. सदर कोम्बिंग ऑपरेशनमध्ये पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी, पोनि सोमनाथ जाधव, स्थानिक गुन्हे शाखा, वाशीम व पथक तसेच सर्व पोलिस स्टेशन प्रभारी अधिकारी व पोलिस अंमलदार यांचा समावेश आहे.
 
Powered By Sangraha 9.0