ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे निधन

    दिनांक :18-Mar-2023
Total Views |
कोल्हापूर, 
ज्येष्ठ अभिनेते Bhalchandra Kulkarni भालचंद्र कुलकर्णी यांचे शनिवारी सकाळी कोल्हापुरात निधन झाले. ते 88 वर्षांचे होते. सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आला. भालचंद्र कुलकर्णी यांचे मराठी चित्रपटातील योगदान मोठे आहे. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या होत्या. त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.
 
 
bhalchandra-kulkarni
 
झुंज तुझी माझी, हळद रुसली कुंकू हसले, जावयाची जात आदी 300 हून अधिक चित्रपटांत त्यांनी काम केले होते. 1984 साली आलेल्या कुलस्वामिनी अंबाबाई या चित्रपटातील ‘चांगभलं रं चांगभलं, देवा ज्योतिबा चांगभलं’ हे त्यांच्यावर चित्रित झालेले गाणे खूपच लोकप्रिय झाले होते. चित्रपट महामंडळाच्या सांस्कृतिक, चित्रपटविषयक तसेच आंदोलनात्मक कामातही ते सक्रिय होते. Bhalchandra Kulkarni भालचंद्र कुलकर्णी यांनी काही काळ शिक्षक म्हणूनही काम केले होते.