1 एप्रिलपूर्वी सत्र सुरू करू नका

    दिनांक :18-Mar-2023
Total Views |
- सीबीएसईचा शाळांना इशारा
 
नवी दिल्ली, 
विद्यार्थ्यांमध्ये चिंता आणि भावनिक ताण निर्माण होण्याची शक्यता असल्याने 1 एप्रिलपूर्वी शाळा सुरू करू नये, अशा इशारा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात् सीबीएसईने दिला आहे. काही शाळांनी त्यांचे शैक्षणिक सत्र विशेषतः दहावी आणि बारावीच्या वर्ग सुरू केले असल्याने CBSE School सीबीएसईने हा इशारा दिला आहे. संलग्न असलेल्या काही शाळांनी यंदा त्यांचे शैक्षणिक सत्र लवकर सुरू केले असल्याचे दिसले आहे.
 
 
cbse sdfg
 
कमी कालावधीत संपूर्ण वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या प्रयत्नामुळे विद्यार्थ्यांसाठी जोखीम उद्भवू शकते आणि शिकण्याचा वेग कायम ठेवण्यासाठी त्यांना धडपड करावी लागू शकते तसेच यामुळे त्यांच्यात चिंता आणि भावनिक तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे, असे सीबीएसईचे सचिव अनुराग त्रिपाठी यांनी जारी केलेल्या अधिकृत आदेशात म्हटले आहे. CBSE School शैक्षणिक सत्र लवकर सुरू केल्याने विद्यार्थ्यांना जीवन कौशल्ये शिकणे, मूल्य शिक्षण, आरोग्य, शारीरिक शिक्षण, कार्य शिक्षण आणि समुदाय सेवा यासार‘या अतिरिक्त हालचालींसाठी पुरेसा वेळ मिळत नाही, असे सीबीएसईने म्हटले आहे. ही सर्व कौशल्ये आत्मसात करणे हे शिक्षणाइतकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे सीबीएसईशी संलग्न असलेल्या शाळांचे मुख्याध्यापक आणि संस्था प्रमुखांना विशिष्ट वेळेपूर्वी शैक्षणिक सत्र सुरू करण्यापासून परावृत्त करण्याचा सल्ला देण्यात आला आहे आणि 1 एप्रिल ते 31 मार्च या शैक्षणिक सत्राचे काटेकोरपणे पालन करावे, असे त्रिपाठी म्हणाले.