अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे नुकसान

- दुसर्‍या दिवशीही पावसाची हजेरी
- चिखलदर्‍यात झाली गारपीट

    दिनांक :18-Mar-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा 
अमरावती, 
Unseasonal rain : अमरावती जिल्ह्यातील काही भागात शुक्रवार 17 व शनिवार 18 मार्च दरम्यान अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
 
Unseasonal rain
 
उपरोक्त दोन दिवसात जिल्ह्यात सरासरी 9.1 मि. मी. पाऊस पडला. अचलपूर तालुक्यात दोन घरांची अंशत: पडझड झाली. चांदूर रेल्वे तालुक्यात पशुधनाची हानी झाली. त्यात दोन जनावरे मृत झाल्याचा अहवाल आहे. चांदूर रेल्वे तालुक्यात 62 हे. आर शेतीचे नुकसान झाले. त्यात गहू, हरभरा, संत्रा पीकाचे नुकसान झाल्याचा अहवाल आहे. धारणी तालुक्यातील हरिसाल मंडळामध्ये गारपीट झाली आहे. मात्र तिथे नुकसान झाले नसल्याची प्राथमिक माहिती आहे. शनिवारी संपूर्ण जिल्ह्यात दिवसभर ढगाळ वातावरण होते. काही ठिकणी पावसाच्या सरी (Unseasonal rain) कोसळल्या. अमरावती शहरात रात्री साडेसात वाजता पावसाने हजेरी लावली. काहीवेळाने पाऊस थांबला. मात्र, ढगाळ वातावरण कायम होते. जिल्ह्याच्या अन्य भागातून नुकसानीची माहिती प्राप्त नाही.
 
 
 
मेळघाटात दुसर्‍या दिवशीही गारपीट
मेळघाटात सलग दुसर्‍या दिवशीही वादळी पाऊस व गारपीट (Unseasonal rain) झाले असून रब्बी पिकांवर याचा मोठा परिणाम झालेला आहे. विदर्भाच्या नंदनवन चिखलदरा या ठिकाणी शनिवार, 18 मार्चला सायंकाळी पाच ते साडेपाचच्या दरम्यान अवकाळी पावसाने तडाखा दिला असून पावसासह गारपीटही झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे; तर तालुक्यातील अनेक भागात मोथा, बोरी, आमझरी यासह चुरणी परिसरातसुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.
 
 
चिखलदरा परिसरात शेती नसल्याने या परिसरात पिकांचे नुकसान झाले नसले तरी या परिसरात वातावरणात गारवा निर्माण झाला आहे आणि उन्हाळ्यात जंगलात आग लागून मोठ्या प्रमाणात जंगल संपत्तीचे मोठे नुकसान होते, ते नुकसान काही काळासाठी होणार नसल्याचे बोलले जात आहे. कारण या पावसामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात गारवा तसेच ओलावा निर्माण झाल्याने जंगलात आग लागणार नाही. यामुळे वन्यजीप्रेमीीमध्ये आनंद निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे तालुक्यातील अनेक भागात आदिवासी बांधव व शेतकर्‍यांच्या रब्बी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. गहू, हरभरा, मसूर अशा अनेक पिकांचे मोठे नुकसान झाले असल्यामुळे शेतकर्‍यांपुढे संकट निर्माण झाले आहे. दुसरीकडे विदर्भाच्या नंदनवनात येणार्‍या पर्यटकांनी या पावसाचा आनंद घेतला आहे.
 
 
मेळघाटातील दुर्गम व डोंगराळ भागात अनेक ठिकाणी गारपीट व अवकाळी पाऊस (Unseasonal rain) पडत असून शनिवारी दुपारी चार ते पाचच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात गारपीट व पाऊस झाल्यामुळे अनेक ठिकाणी गारांचा खच तयार झाला होता. तालुक्यातील चुनखडी, खडीमल या भागात मोठ्या प्रमाणात गारपीट होऊन रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.