शासकीय कर्मचार्‍यांना ‘वर्क फ्रॉम होम’ची परवानगी नाही

    दिनांक :18-Mar-2023
Total Views |
- डॉ. जितेंदसिंह माहिती

नवी दिल्ली, 
शासकीय कर्मचार्‍यांना घरुन काम करण्याची (वर्क फ्रॉम होम) परवानगी दिली जाणार नाही, त्यांना कार्यालयात यावेच लागेल, असे कार्मिक मंत्री Dr. Jitend Singh डॉ. जितेंद्रसिंह यांनी लोकसभेत स्पष्ट केले. भाजपाच्या रंजनबेन धनंजय भट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीनिवास पाटील यांच्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात जितेंद्रसिंह म्हणाले की, केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांना घरून काम करण्याची परवानगी देणे शक्य नाही, त्यांना सदेह कार्यालयात यावेच लागेल.
 
 
Dr. Jitend Singh
 
कोरोना काळात सरकारी कर्मचार्‍यांना घरून काम करण्याची परवानगी देण्यात आली होती, पण ती अपवादात्मक बाब होती, सामान्य स्थितीत तो नियम बनवता येणार नाही, असे ते म्हणाले. कोरोना काळात मध्यम आणि कनिष्ठ स्तरावरील शासकीय कर्मचार्‍यांना घरून काम करण्याची अनुमती देण्यात आली होती, पण परिस्थितीत सुधारणा झाल्यावर हा नियम मागे घेण्यात आला, शासकीय कर्मचार्‍यांनी कार्यालयात येऊन काम करणे अनिवार्य करण्यात आले, त्यामुळे आता या नियमात बदल करता येणार नाही, याकडे Dr. Jitend Singh जितेंदसिंह यांनी लक्ष वेधले. कोरोना काळापासून खाजगी क्षेत्रातील विशेषत: आयटी क्षेत्रातील कंपन्यांनी आपल्या कर्मचार्‍यांसाठी वर्क फ्रॉम होम सुरू केले आहे. कोरोना संपून वर्ष-दीड वर्षाचा काळ लोटला असला तरी, अजूनही आयटी क्षेत्रात वर्क फ्रॉम होम सुरू आहे.