रामनवमीच्या पार्श्वभूमीवर 200 जणांविरुद्ध FIR दाखल

    दिनांक :18-Mar-2023
Total Views |
हजारीबाग, 
Ram Navami : झारखंडच्या हजारीबाग जिल्ह्यात 14 मार्चला मंगला मिरवणुकीत झालेल्या गोंधळाच्या संदर्भात जिल्हा प्रशासनाने 200 अज्ञात लोकांविरुद्ध FIR नोंदवला आहे. रामनवमीनिमित्त ध्वनिमुद्रित संगीत वाजवण्यास आणि लाठ्यांसह पारंपारिक शस्त्रे बाळगण्यास बंदी घालणाऱ्या सरकारच्या आदेशाविरोधात लोकांनी मिरवणूक काढली. हिंदूंच्या सणांमध्ये सरकार जाणीवपूर्वक अडथळे निर्माण करत असल्याचा आरोप लोक करत आहेत.

Ram Navami
 
प्रशासकीय आदेशाचे उल्लंघन करून आंदोलकांनी (Ram Navami) मिरवणुकीदरम्यान रेकॉर्ड केलेले संगीत वाजवले आणि 30 मार्च ते 1 एप्रिल पर्यंत साजऱ्या होणाऱ्या रामनवमीच्या मिरवणुकांमध्ये अडथळा निर्माण करण्याच्या प्रशासनाच्या भूमिकेला धमकी दिली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. मंडळ अधिकारी राजेश कुमार यांनी सांगितले की, उत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आंदोलकांवर कारवाई करण्यासाठी हजारीबाग सदर पोलिस ठाण्यात गुरुवारी एफआयआर दाखल करण्यात आले आहे. हजारीबागचे पोलिस अधीक्षक चोथे म्हणाले, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाने एफआयआर नोंदवण्याचा निर्णय घेतला आहे. उत्सवादरम्यान कोणालाही अडथळा निर्माण करण्याची परवानगी दिली जाणार नाही. स्थानिक लोक एफआयआरच्या विरोधात उभे ठाकले आहेत. शुक्रवारी मोठे आंदोलन करण्यात आले. रामनवमी (Ram Navami) महासमितीचे माजी अध्यक्ष शशी भूषण केसरी यांच्या विरोधातही पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. प्रशासन आणि सरकार रामनवमीला संपवत असल्याचा आरोप त्यांनी केला. कोणत्याही मिरवणूक-उत्सवात कलम 144 लागू करण्याचे औचित्य काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.