युपीने रोखली मुंबईची विजयी घोडदौड

    दिनांक :18-Mar-2023
Total Views |
- टाटा महिला प्रीमियर लीग
- अष्टपैलू दीप्ती शर्मा सामनावीर

मुंबई, 
अ‍ॅलिसा हिलीच्या नेतृत्वाखालील Grace Harris युपी वॉरियर्सने टाटा महिला प्रीमियर लीगमध्ये हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सची विजयी घोडदौड रोखली. सलग पाच विजयानंतर मुंबई इंडियन्सला युपी वॉरियर्सकडून पहिला पराभव पत्करावा लागला. डी.वाय. पाटील स्टेडियमवर युपी वॉरियर्सने मुंबई इंडियन्सवर 3 चेंडू शिल्लक ठेवीत 5 गड्यांनी दणदणीत विजय नोंदविला. या विजयाबरोबर युपी वॉरियर्सने 6 गुणांसह गुणतालिकेत तिसरे स्थान मिळविले असून मुंबई 10 गुणांसह अव्वल, तर दिल्ली कॅपिटल्स 8 गुणांसह दुसर्‍या स्थानावर आहे.
 
 
PTI03_18_2023_000214A
 
Grace Harris : युपी वॉरियर्सने नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरविताना युपी वॉरियर्सच्या गोलंदाजांनी मुंबईचा डाव मर्यादित षटकांत 127 धावांत गुंडाळला. युपीने 19.3 षटकांत 5 बाद 129 धावा काढून शानदार विजय नोंदविला. मुंबई इंडियन्सकडून हिली मॅथ्यूज (35), कर्णधार हरमनप्रीत कौर (25) व ईस्सी वाँगने (32) एकाकी झुंज देत संघाच्या धावसं‘येस आकार दिला, मात्र इतर फलंदाज एक अंकी धावा काढून तंबूत परतल्या. तिघींशिवाय कोणताही फलंदाज युपी वॉरियर्सच्या गोलंदाजांसमोर फार वेळ खेळपट्टीवर टिकाव धरू शकला नाही. यास्तिका भाटिया (7), नॅट स्कीव्हर-ब‘ण्ट (5) व अ‍ॅमेलिया केर (3) या भरवशाच्या खेळाडू लवकरच बाद झाल्या. युपी वॉरियर्सच्या सोफिया एक्लेस्टोनने 15 धावांत 3 बळी टिपले, तर राजेश्वरी गायकवाड व दीप्ती शर्माने प्रत्येकी 2 बळी व अंजली सर्वानीने एक बळी टिपला.
 
 
 
विजयासाठी धावांचा पाठलाग करताना Grace Harris युपी वॉरियर्सचे सलामी फलंदाज देविका वैद्य (1), अ‍ॅलिसा हिली (8) व किरण नवगिरे (12) लवकरच तंबूत परतले, मात्र त्यानंतर ताहिला मॅकग्रा (38) व ग्रेस हॅरिसने (39) दमदार फलंदाजी करीत युपी वॉरियर्सच्या विजयाच्या आशा पल्लवीत ठेवल्या. ताहिला व ग्रेसने पाचव्या गड्यासाठी 44 धावांची भागीदारी केली. पुढे दीप्ती शर्मा (नाबाद 13) व सोफिया एक्लेस्टोनने (नाबाद 16) नाबाद खेळी करीत युपी वॉरियर्सच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. ताहिलाने 25 चेंडूंत 6 चौकार व एका षट्कारसह 38 धावांचे, तर ग्रेसने 28 चेंडूंत 7 चौकारांसह 39 धावांचे योगदान दिले. मुंबईकडून अ‍ॅमेलिया केरने 2 बळी, तर नॅट स्कीव्हर-ब‘ण्ट, हिली मॅथ्यूज व ईस्सी वाँगला प्रत्येकी 1 बळी टिपण्यात यश मिळाले.