इम्रान खानवर आज सुनावणी!

    दिनांक :18-Mar-2023
Total Views |
इस्लामाबाद,  
तोशाखाना प्रकरणात हजर राहण्यासाठी Imran Khan Hearing  पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान हे लाहोरच्या जमान पार्क येथून इस्लामाबादला रवाना झाले आहेत. इम्रान रस्त्याने इस्लामाबादला जात असून या ताफ्यात पीटीआयचे कार्यकर्ते आणि लोकही मोठ्या संख्येने दिसत आहेत. इस्लामाबादच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयात आज या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. शुक्रवारीच इम्रानला उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला असून न्यायालयाने त्याच्या अटक वॉरंटला स्थगिती दिली आहे. 
 
fty
 
 
मुख्य आयुक्त कार्यालय Imran Khan Hearing  इस्लामाबादने जी-11 येथील न्यायालय क्रमांक 1 न्यायिक संकुलात जिल्हा निवडणूक आयुक्तांनी इम्रानविरुद्ध दाखल केलेल्या खटल्याच्या सुनावणीसाठी व्यवस्था केली आहे. गेल्या गुरुवारी न्यायालयाने त्याच्याविरुद्ध जारी केलेले अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्यास नकार दिला. मात्र, शुक्रवारी उच्च न्यायालयाकडून त्यांना दिलासा मिळाला असून अटक वॉरंटला स्थगिती देण्यात आली आहे. त्यांचे वकील ख्वाजा हॅरिस यांनी शुक्रवारी न्यायालयात कागदपत्रे सादर करताना पीटीआय प्रमुख १८ मार्च रोजी न्यायालयात हजर राहतील, असे आश्वासन दिले. तत्पूर्वी, लाहोर उच्च न्यायालयाने इम्रान खानच्या अटकेबाबत सुरू असलेल्या हायव्होल्टेज राजकीय नाट्याबद्दल इम्रान आणि त्याच्या समर्थकांना फटकारले होते. पोलिस आणि इम्रान खान यांच्या 'बेकाबू' समर्थकांमध्ये झालेल्या हिंसक चकमकीमुळे संपूर्ण जगासमोर पाकिस्तानची प्रतिमा डागाळली आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. तसेच, न्यायालयाने इम्रान खान यांचा पक्ष, पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) ला देशाचे राष्ट्रीय चिन्ह, मिनार-ए-पाकिस्तानजवळ रॅली काढण्यास मज्जाव केला.