हार्दिक सिंग, सविता पुनिया वर्षातील सर्वोत्तम हॉकीपटू

    दिनांक :18-Mar-2023
Total Views |
नवी दिल्ली,
उदयोन्मुख स्टार खेळाडू हार्दिक सिंग आणि अनुभवी गोलरक्षक सविता पुनिया यांना एका शानदार Hockey India हॉकी इंडिया वार्षिक पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्तम पुरुष व महिला ‘प्लेअर ऑफ द इयर’ म्हणून सन्मानित करण्यात आले. हार्दिक व सविता या दोघांनाही आकर्षक चषकासह प्रत्येकी 25 लाख रुपये रोख पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यात एकूण 2.7 कोटी रुपयांपेक्षा जास्त रोख पुरस्कार वितरीत करण्यात आले.
 
 
savita
 
यावेळी Hockey India हॉकी इंडियाने 2021 साठीचे पुरस्कारसुद्धा देण्यात आले. कारण कोरोना संकटामुळे पुरस्कार वितरण सोहळा होऊ शकला नाही. 24 वर्षीय मिडफिल्डर हार्दिकने मनप्रीत सिंग आणि हरमनप्रीत सिंग या खेळाडूंवर मात करून 2022 चा प्रतिष्ठित पुरस्कार पटकावला. महिला प्रो-लीगमध्ये स्थान मिळविण्यासाठी सविताने गत डिसेंबरमध्ये भारताला एफआयएच महिला राष्ट्र चषक विजेतेपद मिळवून दिले होते. हे एक विलक्षण वर्ष आहे आणि माझ्या प्रयत्नांना मान्यता मिळाल्याने खूप छान वाटत आहे, असे हार्दिक म्हणाला. प्रामाणिकपणे सांगायचे तर, मी नि:शब्द आहे; हा एक मोठा सन्मान आहे, असे सविता म्हणाली.