इम्रानच्या कारला अपघात, घरावर बुलडोझर!

    दिनांक :18-Mar-2023
Total Views |
इस्लामाबाद, 
इम्रान खान यांच्या अटकेवरून पाकिस्तानात Imran accident राजकीय गोंधळ सुरूच आहे. दरम्यान, पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ पक्षाचे प्रमुख आणि माजी पंतप्रधान इम्रान खान हे तोशाखाना खटल्याच्या सुनावणीसाठी शनिवारी इस्लामाबादला रवाना झाले. मात्र, वाटेत त्यांच्या ताफ्यातील एका वाहनाला अपघात झाला. या घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर इम्रान खान यांनी ट्विट करत म्हटले आहे की, "सर्व प्रकरणांमध्ये जामीन मिळाल्यानंतरही पाकिस्तान डेमोक्रॅटिक मूव्हमेंट (पीडीएम) आघाडी सरकार मला अटक करू इच्छित आहे, हे स्पष्ट आहे.
 

gyht
 
 
 
लाहोरमधील इम्रान खान यांचे घर असलेल्या Imran accident जमान पार्क येथे इम्रान खान समर्थकांना हटवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला आहे. इस्लामाबादच्या एंट्री पॉइंटवर कंटेनर लावून इम्रानच्या ताफ्याला थांबवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. केवळ इम्रान खान यांच्या वाहनाला न्यायालयीन संकुलात जाण्याची परवानगी आहे. सोबत एक सुरक्षा वाहनाला परवानगी देण्यात आली आहे. मात्र समर्थक इम्रानसोबत जाण्यावर ठाम आहेत. टोल प्लाझा ते न्यायालयीन संकुलापर्यंत चार थरांमध्ये कंटेनर लावून ताफ्याला थांबवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शनिवारी लाहोरमधील इम्रान खान यांच्या घरावर बुलडोझर गेला आणि पोलिसांनी त्यांच्या घराचे गेट तोडून आत प्रवेश केला. त्याचवेळी इस्लामाबादमध्ये प्रवेश करण्यापूर्वी इम्रान यांच्या ताफ्याला टोल प्लाझा येथे थांबवण्यात आले. इम्रान खान यांनी शेहबाज शरीफ सरकारवर गंभीर आरोप करताना म्हटले आहे की, "मला अटक करण्याचा कट रचला जात आहे. माझा कायद्यावर विश्वास आहे. सरकारचा हेतू स्पष्ट नाही. पोलिसांनी माझ्या लाहोरमधील घरावर हल्ला केला आहे." माझी पत्नी बुशरा बेगम घरी एकट्या आहेत. पोलीस कोणत्या कायद्याखाली कारवाई करत आहेत.