वन-डे मालिकाही जिंकण्याचे भारताचे लक्ष्य

    दिनांक :18-Mar-2023
Total Views |
विशाखापट्टणम्, 
येथील डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए स्टेडियमवर रविवारी India-Australia भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय कि‘केट सामना खेळला जाणार असून हा सामना जिंकून तीन सामन्यांची वन-डे मालिका जिंकण्याचे टीम इंडियाचे लक्ष्य आहे.
 
 
rohit dksla;
 
नियमित कर्णधार रोहित शर्माही मुंबईत सलामीच्या सामन्याला मुकल्यानंतर संघाचे नेतृत्व करण्यासाठी परतणार आहे. रोहितच्या अनुपस्थितीत हार्दिक पांड्याने शुक‘वारी वानखेडे स्टेडियमवर पहिल्या एकदिवसीय सामन्यात संघाचे नेतृत्व केले. India-Australia भारताने ऑस्ट्रेलियावर 5 गड्यांनी रोमहर्षक विजय नोंदविला. केएल राहुल व रवींद्र जडेजाने चिवट झुंज देत भारताला संघर्षपूर्ण सामन्यात केवळ परत आणले नाही, तर भारताला विजय मिळवून दिला. राहुल व जडेजाने विजयी खेळी करीत 108 धावांची मोलाची भागीदारी केली. या विजयात मोहम्मद शमी व मोहम्मद सिराजच्या प्रभावी गोलंदाजीनेही मोठा वाटा उचलला आहे. या दोघांनीही प्रत्येकी तीन बळी टिपले, तर जडेजाने 2 बळी टिपले आणि ऑस्ट्रेलियाला 35.4 षटकांत 188 धावांतच रोखले. अष्टपैलू जडेजा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. या सामन्यात केएल राहुलला सूर गवसला व त्याने धीरगंभीरपणे नाबाद 75 धावांची खेळी केली. गुडघ्याच्या दुखापतीतून सावरलेल्या जडेजाने नाबाद 45 धावा केल्या व प्रभावी गोलंदाजी करीत 46 धावांत 2 बळीही मिळविले.
 
 
 
India-Australia या वर्षाच्या अखेरीस भारतामध्ये होणारी वन-डे विश्वचषक स्पर्धा लक्षात घेता केएल राहुल व जडेजाचा फॉर्म भारतासाठी जमेची बाजू ठरेल. रोहित शर्मा कर्णधारपदावर परतल्यामुळे भारताच्या अव्वल फळीला नक्कीच बळकटी मिळेल. मात्र त्याच्या पुनरागमनमुळे अंतिम अकराच्या खेळाडूंमधून कोणत्याही खेळाडूला विश्रांती मिळते, हे बघणे उत्सुकतेचे ठरणार आहे. यात सूर्यकुमार यादव किंवा ईशान किशनपैकी एकाला दुसर्‍या वन-डेसाठी अंतिम अकरामधून बाहेर व्हावे लागण्याची शक्यता आहे. तसे सूर्यकुमारची शक्यता अधिक आहे, कारण वन-डे कि‘केटमध्ये तो सतत अपयशी ठरत आहे. तिकडे, ऑस्ट्रेलियाला मालिकेदरम्यान वेगवेगळे संयोजन वापरायचे आहे. पहिल्या वन-डे सामन्यात ऑस्ट्रेलियाने मिचेल मार्श, कॅमेरून ग‘ीन, मार्क्स स्टोइनिस व ग्लेन मॅक्सवेल हे चार अष्टपैलू खेळाडूंना खेळविले, पण तरीही ते भारताला जास्त त्रास देऊ शकले नाहीत. ही बाब कर्णधार स्टीव्ह स्मिथसाठी चिंतेचा विषय ठरेल.