साडेबारा हजार महिलांचा प्रवास

- पहिल्या दिवशीची आकडेवारी समोर

    दिनांक :18-Mar-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा 
अमरावती, 
Journey of Women : एसटी बसमध्ये महिलांना 50 टक्के सवलत देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी 17 मार्चपासून सुरू झाली. पहिल्या दिवसाची आकडेवारी शनिवार 18 मार्चला समोर आली असून जिल्ह्यात 12 हजार 568 महिलांनी प्रवास केला. जिल्ह्यात महामंडळाचे अमरावती, बडनेरा, परतवाडा, वरूड, चांदूर रेल्वे, दर्यापूर, मोर्शी, चांदूर बाजार असे आठ आगार आहे. या सर्व आगारातून 17 मार्चला बसमध्ये बसलेल्या महिला प्रवशांना 50 टक्के सवलत देण्यात आली. चांदूर रेल्वे आगार महिला प्रवाशी संख्येत आघाडीवर होता. उत्पन्नाच्या दृष्टीने परतवाडा आगार पहिल्या स्थानी आहे. पहिल्या दिवशी सवलतीत प्रवास करणार्‍या महिलांकडून मंडळाला 3 लाख 27 हजार उत्पन्न मिळाले.
 
Journey of Women