योगी आदित्यनाथांनी पूर्ण केले काशी विश्वनाथ दर्शनाचे शतक

    दिनांक :18-Mar-2023
Total Views |
वाराणसी, 
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या 113 व्या वाराणसी दौर्‍यावर Kashi Vishwanath Temple काशी विश्वनाथ मंदिराला 100व्यांदा भेट दिली. काशी विश्वनाथला इतक्या वेळा भेट देणारे योगी आदित्यनाथ हे पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत. योगी आदित्यनाथ यांनी आपल्या 6 वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात सरासरी दर 21 व्या दिवशी वाराणसीला भेट दिली आहे. येथे त्यांनी पूजेसह विकासकामांचा आढावाही घेतला.
 
 
YOGI--100-DARSHAN
 
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी Kashi Vishwanath Temple काशी विश्वनाथ मंदिरात केवळ राज्यातीलच नव्हे, तर संपूर्ण देशातील इतर कोणत्याही राज्याच्या मुख्यमंत्र्यांपेक्षा जास्त वेळा हजेरी लावली आहे. येथे योगी आदित्यनाथ षोडशोपचार पद्धतीने पूजा-अर्चा करतात. या दरम्यान वैदिक व पौराणिक मंत्रांद्वारे देवतांची स्तुती केली जाते व यात षोडशोपचार आणि पंचोपचार पूजा केली जाते तसेच पुरुष सूक्ताचे षोडश मंत्र व रुद्र सूक्ताचे नमस्ते रुद्र इत्यादी षोडश मंत्रांचे उच्चार केले जातात. या उपासनेत तो जगाच्या कल्याणाची कामना करतो. योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्री असताना केलेल्या या विक्रमामुळे काशी विश्वनाथ मंदिर प्रशासनही खुश आहे. ही विक्रमी संख्या सरकारी आकडेवारी आहे, असे मंदिर प्रशासनाचे सीईओ सुनील वर्मा यांनी म्हटले आहे.