अमेरिका-उत्तर कोरियात तणाव वाढला

18 Mar 2023 20:12:27
-किम जोंग उनचे सैन्य सज्ज
 
प्योंगयाँग, 
उत्तर कोरियाचा हुकूमशाह Kim Jong Un किम जोंग उन रणशिंग फुंकण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून उत्तर कोरिया आणि अमेरिकेत मोठ्या प्रमाणात तणाव वाढला आहे. उत्तर कोरियातील सुमारे आठ लाख नागरिक अमेरिकेविरुद्ध लढण्यासाठी देशाच्या सैन्यात स्वेच्छेने सामील झाले आहेत, असा दावा उत्तर कोरियाने शनिवारी केला. उत्तर कोरियाकडून वाढत्या धोक्यांना तोंड देण्यासाठी दक्षिण कोरिया आणि अमेरिकी सैन्याने संयुक्त युद्धाभ्यासाला सुरुवात केली आहे. याविरोधात चिथावणीखोर इशारा देण्यासाठी किम जोंगने आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. एका आठवड्यात उत्तर कोरियाने तीन वेळा क्षेपणास्त्र चाचणी घेतली आहे. त्यामुळे किम जोंग उन युद्धाच्या तयारीत आहे की काय, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.
 
 
Kim Jong Un
 
उत्तर कोरियाचे सरकारी वृत्तपत्र रॉडॉन्ग सिनमुननेदिलेल्या वृत्तानुसार, उत्तर कोरियातील आठ लाख नागरिक सैन्यात भरती होऊन अमेरिकेविरोधात लढण्यासाठी तयार असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेचा सामना करण्यासाठी देशभरातील सुमारे आठ लाख विद्यार्थी आणि कामगारांनी शुक‘वारी उत्तर कोरियाच्या सैन्य दलात सामील होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अमेरिका आणि दक्षिण कोरियातील वाढत्या जवळीकीमुळे हा तणाव निर्माण झाला आहे. या दोन्ही देशांतील संबंध धोकादायक असल्याचे उत्तर कोरियाला वाटते. त्याचबरोबर अमेरिका आणि दक्षिण कोरिया वेळोवेळी संयुक्त लष्करी सरावही करतात. हे पाहता Kim Jong Un किम जोंग उन यांनी अनेकवेळा अमेरिकेला थेट युद्धाची धमकी दिली आहे.
Powered By Sangraha 9.0