मंदिरावर वीज कोसळल्याने कळस तुटला

- चांदूर बाजार येथील घटना

    दिनांक :18-Mar-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा 
चांदूर बाजार, 
Lightning struck : शहरातील मध्यवस्तीत असलेल्या पुरातन हनुमान मंदिरावर वीज कोसळल्याने मंदिराच्या कोरीव कळसाचे नुकसान झाले आहे. काही दिवसांपासून वातावरणात झालेल्या अचानक बदलामुळे विदर्भासह चांदूर बाजार तालुक्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अशातच चांदुर बाजार शहरात शुक्रवारी 17 मार्चला मध्यरात्री विजेचा कडकडात वार्‍यासह जोरदार पाऊस बरसला. यादरम्यान आकाशात अचानक मोठा आवाज होत हनुमान मंदिरावर वीज कोसळली. यावेळी आवाज इतका मोठा होता की , मध्यरात्री गाढ झोपेत असलेले मंदिर परिसरातील नागरिक आवाजाने जागे झाले. वीज पडल्यामुळे सुदैवाने मंदिर परिसरात असलेल्या घरांचे कोणतेही नुकसान झाले नसले तरी मंदिराच्या कळसाचे नुकसान झाले आहे.
 
Lightning struck