रजनीकांतनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

    दिनांक :18-Mar-2023
Total Views |
मुंबई, 
दक्षिणेतील सुपरस्टार Rajinikanth रजनीकांत यांनी शनिवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. रजनीकांत हे शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर समर्थक असून, त्यांनी ही औपचारिक भेट घेतल्याचे पक्षाच्या नेत्यांनी सांगितले. उद्धव ठाकरे आणि रजनीकांत यांच्यात गैर-राजकीय चर्चा झाली. बांद्रा येथील ‘मातोश्री’ या निवासस्थानावर उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलं आदित्य व तेजस ठाकरे यांनी रजनीकांत यांचे स्वागत केले.
 
 
Rajinikanth
 
पुष्पगुच्छ आणि शाल देऊन ठाकरे कुटुंबीय Rajinikanth रजनीकांत यांचे स्वागत करीत असल्याचे छायाचित्र आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवर सामायिक केले आहे. रजनीकांतजी यांनी पुन्हा मातोश्रीला भेट दिल्यामुळे आनंदी आहे, असे या ट्विटमध्ये म्हटले आहे. यापूर्वी रजनीकांत यांनी बाळासाहेब ठाकरे यांची 2010 मध्ये मातोश्रीवर भेट घेतली होती. रजनीकांत यांनी जुलै 2021 मध्ये त्यांचा राजकीय पक्ष रजनी मक्कल मंद्रम गुंडाळला आणि भविष्यात सकि‘य राजरकारणात सहभागी होणार नाही, अशी घोषणा केली होती.