पंतप्रधान मोदी यांनी केले रावसाहेब दानवे यांचे कौतुक

    दिनांक :18-Mar-2023
Total Views |
- एका महिन्यात दोनदा केले रिपोस्ट

नवी दिल्ली, 
केंद्रीय रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री Raosaheb Danve रावसाहेब दानवे यांचे ट्विट एका महिन्यात दोनदा रिट्विट करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या कामाची एकप्रकारे प्रशंसा केली. रेल्वेने आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधत महिला लोको पायलट सुरेखा यादव यांच्याकडे प्रतिष्ठित अशा वंदेभारत गाडीचे सारथ्य सोपवले होते. ही माहिती दानवे यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवर पोस्ट करीत सुरेखा यादव यांच्या कर्तृत्वाचे कौतुक केले होते. यादव या आशिया खंडातील पहिल्या महिला लोको पायलट आहेत. मुंबई ते सोलापूर वंदेभारत एक्स्प्रेस चालवतानाचे सुरेखा यादव यांचे छायाचित्र दानवे यांनी पोस्ट केले होते. दानवे ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली.
 
 
danve
 
Raosaheb Danve दानवे यांचे हीच पोस्ट पंतप्रधानांनी रिपोस्ट करीत सुरेखा यादव यांचे कौतुक केले तसेच देशाच्या प्रगतीत महिलांचा कसा सिंहाचा वाटा असतो, याकडे लक्ष वेधले. हे भारताच्या महिला शक्तीच्या आत्मविश्वासाचे प्रतीक आहे, असे मोदी यांनी म्हटले आहे. याआधी दानवे यांनी बंद पडलेल्या 30 कोळसा खाणीच्या ठिकाणी आपल्या मंत्रालयाने जैव पर्यटन केंद्र सुरू केल्याबाबत पोस्ट केली होंती. पंतप्रधान मोदी यांनी दानवे यांची ही पहिली पोस्ट रिपोस्ट केली होती.
राष्ट्रपती, पंतप्रधानांनीं दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
रावसाहेब दानवे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. मुर्मु आणि मोदी यांनी पत्र पाठवून दानवे यांचे अभिष्टचिंतन केले.