आजचे राशीभविष्य शनिवार १८ मार्च २०२३

    दिनांक :18-Mar-2023
Total Views |

Today's Horoscope
Today's Horoscope
मेष : 
मानसिक चलबिचलता राहील. फार विचार करण्यात वेळ वाया घालवू नका. सामाजिक भान राखून वागाल. कार्यक्षेत्रात वाढीव अधिकार प्राप्त होतील. जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल.
 
वृषभ : 
जोडीदाराच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू नका. घरात आनंदी वातावरण राहील. वैवाहिक जीवन सुखमय असेल. गृहोपयोगी वस्तूंची खरेदी कराल. ज्येष्ठांचा सल्ला व मत उपयोगी पडेल.
 
मिथुन : 
जवळच्या नातेवाईकांशी गप्पा होतील. कलेला चांगले प्रोत्साहन मिळेल. मान-सन्मान प्राप्त होतील. आनंदाची अनुभूति घ्याल. कामाच्या स्वरुपात काही क्षुल्लक बदल करावे लागतील.
 
कर्क : 
पैशाची गुंतवणूक योग्य प्रकारे करा. अतितिखट पदार्थ टाळा. प्रलंबित कामे मार्गी लागू शकतील. नवीन ओळखीतून चांगला लाभ होईल. सामाजिक कामात सहभाग घ्याल.
 
सिंह : 
आपली चांगली वर्तणूक लोकांना आकर्षित करेल. त्यातूनच समाधान लाभेल. जवळच्या व्यक्तीच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न कराल. टीमवर्क यशस्वी रित्या पार पाडाल. समस्यांचे निराकरण करता येईल.
 
कन्या : 
लोकांशी बोलताना आपले विचार पक्के ठेवा. आपले मुद्दे ठामपणे मांडा. कोणत्याही वादात अडकू नका. वातावरण अनुकूलतेसाठी प्रयत्न करावेत. महिला सहकार्‍याकडून मदत मिळेल.
 Today's Horoscope
तूळ : 
आपली एखादी चुकही मान्य करावी लागेल. निष्काळजीपणा कमी करा. ज्येष्ठ व्यक्तींच्या भेटीचे योग. कामातून काहीनाकाही लाभ मिळेल. कामातील तांत्रिक बाजू जाणून घ्या.
 
वृश्चिक : 
कामातील ताणाचे योग्य नियोजन करावे. अतिरिक्त भर घेऊ नका. एखाद्या गोष्टीत माघार घ्यावी लागू शकते. तज्ञांच्या मतावर विश्वास ठेवून काम करावे. आपली जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडू शकाल.
 
धनू : 
कामाचा उरक वाढवा. मुलांकडून लाभ होतील. जुनी देणी फेडू शकाल. कामात आपले मत विचारात घेतले जाईल. आवश्यक गृहोपयोगी वस्तु खरेदी कराल.
 
मकर : 
समोरील व्यक्ति आपला निर्णय मान्य करेल. हुशारीने वागावे. प्रवास लाभदायक ठरतील. जुन्या मित्रांशी संवाद साधता येईल. कर्जाऊ व्यवहार टाळावेत.
 
कुंभ : 
जोडीदाराच्या मदतीने अडकलेली कामे पुढे न्याल. दिवस मजेत जाईल. अनावश्यक खर्च टाळावेत. बोलताना शब्द जपून वापरावेत. गुंतवणुकीतून चांगला लाभ होईल.
 
मीन : 
लोकांवर अतिअवलंबून राहू नका. पुढे ढकललेले काम हाती घ्यावे. संपत्तीत वृद्धी होऊ शकेल. काही कारणास्तव प्रवास करावा लागेल. कोणत्याही गोष्टीत अति घाई करू नका.