विद्यापीठाच्या महिला चमूचा तृतीय क्रमांक

- अ. भा. आंतरमहाविद्यालयीन विद्यार्थी संसद

    दिनांक :18-Mar-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा 
अमरावती, 
Women's Team : डॉ. एच. एस. गौर विद्यापीठ, सागर येथे 14 ते 16 मार्च दरम्यान झालेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ महिला विद्यार्थी संसदमध्ये संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या महिला विद्यार्थी संसद चमूला तृतीय उपविजेतेपद प्राप्त झाले असून विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
 
Women's Team
 
महिला विद्यार्थी (Women's Team) संसद चमूमध्ये डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय, अमरावतीची आकांक्षा असनारे, सिपना अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावतीची श्रेया शेळके व फार्मसी महाविद्यालय, बडनेराची नफिसा शब्बीर हुसैन यांचा समावेश आहे. या चमूला लोकनायक बापुजी अणे महाविद्यालय, यवतमाळचे डॉ. संतोष गोरे व अमोलकचंद महाविद्यालय, यवतमाळचे डॉ. अंजू फुलझेले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. महिला विद्यार्थी संसद चमूचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगांवकर, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजीव बोरकर यांनी अभिनंदन केले आहे.