नितू, प्रीती, मंजू उप-उपांत्यपूर्व फेरीत

    दिनांक :18-Mar-2023
Total Views |
- जागतिक महिला मुष्टियुद्ध स्पर्धा

नवी दिल्ली,
येथे सुरू असलेल्या Women's Boxing महिलांच्या जागतिक मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या नितू गंघास, प्रीती व मंजू बांबोरियाने आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व गाजवून स्पर्धेच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेती नितू गंघासने (48 किग्रॅ) आपल्या मोहिमेला शैलीत सुरुवात करताना कोरियाच्या डोयोन कांगवर आरएससी (रेफरीने थांबवलेली लढत) विजय नोंदविला, तर प्रीतीने (54 किग्रॅ) रोमानियाच्या लॅक‘ॅमिओरा पेरीजोकवर 4-3 असा विजय मिळविला. हा तिचा स्पर्धेतील दुसरा विजय ठरला. मंजू बांबोरिया (66 किग्रॅ) हिने न्यूझीलंडच्या कारा व्हारेराऊचा 5-0 असा एकमताने पराभव केला.
 
 
PTI03_18_2023_000190B
 
हरयाणाच्या प्रीतीने चुरशीच्या लढतीत पेरिजोकविरुद्ध चिवट झुंज दिली. तिने दमदार पध्दतीने पहिल्या फेरीत आपल्या Women's Boxing प्रतिस्पर्ध्याला जोरदार ठोसे मारण्यास सुरुवात केली. सावध सुरुवातीनंतर पेरीजोकने दुसर्‍या फेरीत प्रभावी पुनरागमन करून ही लढत अत्यंत चुरशीची केली. मात्र प्रीतीने आपल्या तांत्रिक क्षमतेच्या बळावर पेरिजोकवर मात केली. आता प्रीतीचा पुढील सामना गतवर्षीच्या विश्व रौप्यपदक विजेत्या थायलंडच्या जुटामास जितपॉन्गविरुद्ध होणार आहे.48 किग्रॅ वजन गटात 22 वर्षीय नितू घनघासने पहिल्या फेरीतच दक्षिण कोरियाच्या कांग डो-यॉनचा आरामात पराभव केला. नितूचे अथक आक‘मण कमी होण्याची चिन्हे दिसत नसल्यामुळे अखेर पंचांनी पहिल्या फेरीतच लढत थांबविली व नितूला विजयी घोषित केले. आता नितूचा पुढील फेरीत ताजिकिस्तानच्या सुमैया कोसिमोवाशी सामना होणार आहे.
 
 
 
Women's Boxing : प्रीती आणि नीतूच्या विजयानंतर, मंजू (66 किलो) हिनेही न्यूझीलंडच्या कारा व्हारेरॉविरुद्ध सर्वानुमते लढत जिंकली. स्पर्धेच्या तिसर्‍या दिवशी भारतीय खेळाडूंनी निर्विवाद वर्चस्व गाजविले. आता मंजूची पुढील लढतीत उझबेकिस्तानच्या अव्वल मानांकित नवबखोर खामिडोवाशी गाठ पडणार आहे. रविवारी विद्यमान विश्वविजेती भारताची निखत झरीन (50 किग्रॅ) अल्जेरियाच्या रुमायसा बौलमविरुद्ध रिंगमध्ये उतरणार आहे, तर 2022 विश्व कांस्यपदक विजेती मनीषा मून (57 किग्रॅ) आपल्या मोहिमेला सुरुवात करेल.