ईडी-सीबीआयने घडविलेले विरोधी ऐक्य टिकेल?

ed cbi भाजपा गेल्या नऊ वर्षांपासून केंद्रात सत्तेवर

    दिनांक :18-Mar-2023
Total Views |
कटाक्ष
- गजानन निमदेव
 
ed cbi जोपर्यंत एखादा नागरिक दोषी सिद्ध होत नाही, तोपर्यंत तो निर्दोष आहे, अशी स्पष्ट तरतूद आपल्या कायद्यांमध्ये आहे. भारतीय घटनेनुसारच कायदे तयार झाले आहेत. त्यामुळे काँग्रेससह सगळे विरोधी पक्ष सध्या जो तमाशा करीत आहेत, तो भारतीय घटनेचा अवमान करणारा आहे. ed cbi भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानावर आणि संविधानानुसार तयार झालेल्या कायद्यांवर राहुल गांधी, त्यांचे सगळे साथीदार आणि इतर विरोधी पक्षांचा विश्वास नाही, असाच निष्कर्ष काढावा लागेल. तुम्ही जर कुठलेही गैरकृत्य केलेले नाही तर घाबरण्याचे कारण काय? ed cbi कुठलाही भ्रष्टाचार तुमच्या हातून घडलेला नाही, मग ईडी, सीबीआय यांसारख्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशीविरुद्ध आवई उठविण्याची गरज काय? धुतल्या तांदळासारखे तुम्ही स्वच्छ आहात ना, मग जा की चौकशीला सामोरे! ed cbi उगाच कशाला मोदी सरकार आणि तपास यंत्रणांच्या नावाने खडे फोडता? तुम्ही चोरी केली आहे की नाही, तुम्ही गैरप्रकार केला आहे की नाही, हे तपासण्यासाठी चौकशी तर करावीच लागेल ना? ed cbi चौकशीत जे काही आढळून येईल, त्यावर न्यायालय विचार करेल.
 
 
ed
 
ed cbi कायद्याच्या चौकटीच्या बाहेर तर न्यायालयेही जात नाहीत. घटनेने निर्माण झालेली न्यायालये उपलब्ध पुरावे आणि होणा-या साक्षी या आधारेच निवाडे देत असतात. त्यामुळे तुम्ही न्यायालयांवर विश्वास ठेवला पाहिजे. ed cbi चौकशीला सामोरे गेले पाहिजे. विनाचौकशी निर्दोष सोडा, असा जर तुमचा आग्रह असेल तर तो चुकीचा आहे. ed cbi तुमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास नसल्याचे दर्शवितो. ईडी-सीबीआयच्या धाडी पडत आहेत, चौकशीसाठी बोलावले जात आहे म्हणून विरोधी पक्षांचे नेते घाबरले आहेत. घाबरल्यामुळे अस्वस्थ आहेत. अस्वस्थतेतून ते पंतप्रधान मोदींवर टीका करीत आहेत. ed cbi त्यांच्यावर हुकूमशहा असल्याचा आरोप करीत आहेत. देशात लोकशाही धोक्यात आल्याचा आणि सहिष्णुता संपल्याची ओरड करीत आहेत. ed cbi याचा दुसरा अर्थ असा की, पंतप्रधान जर लोकशाहीवादी असतील तर त्यांनी ईडी-सीबीआयसारख्या तपास यंत्रणाच बंद केल्या पाहिजेत आणि स्वत:ला तसे असल्याचे दाखविले पाहिजे, ही विरोधकांची अपेक्षाच मुळात लोकशाहीच्या मुळावर घाव घालणारी आहे.
 
 
 
ed cbi काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि इतरही विरोधी नेत्यांनी गेल्या काही दिवसांपासून अदानींचा मुद्दा उचलून धरला आहे. या मुद्यावरून त्यांनी संसदेचे कामकाज ठप्प पाडले आहे. अदानी प्रकरणाला घोटाळ्याचे रूप देऊन या घोटाळ्याच्या चौकशीसाठी संसदीय समितीच्या स्थापनेची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. ed cbi काँग्रेसची केंद्रात सत्ता असताना बोफोर्स तोफांच्या खरेदीचा करार झाला होता. या सौद्यात दलाली देण्यात आल्याचा आरोप भाजपाने केला होता आणि बोफोर्स हा घोटाळाच असल्याचे सांगत प्रचंड गदारोळ केला होता. तोच प्रकार आता काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष करत आहेत. पण, बोफोर्स प्रकरणात जी दलाली दिली होती, त्याची रक्कम थेट बँक खात्यात जमा झाल्याचे सिद्ध झाले होते. ed cbi अदानींच्या प्रकरणात असा कुठलाही पुरावा राहुल वा त्यांचे साथीदार आणि अन्य विरोधक आजवर देऊ शकलेले नाहीत, हे वास्तव आहे. राफेल ही लढाऊ विमाने खरेदी करण्याचा करार फ्रान्स सरकारसोबत करण्यात आला, त्यावेळीही राहुल गांधी आणि काँग्रेसने मोदी सरकारविरुद्ध गदारोळ केला होता. ed cbi पण, या प्रकरणात घोटाळा झाल्याचा एकही पुरावा ते आजपर्यंत देऊ शकले नाहीत.
 
 
बोफोर्स प्रकरणात भाजपाने फक्त पोकळ आरोप केला नव्हता, तर पुरावे दिले होते. ed cbi त्यामुळे आंदोलन सफल करण्यात भाजपाला यश मिळाले होते. याउलट, राफेल काय किंवा अदानी प्रकरण काय, दोन्ही बाबतीत काँग्रेस फक्त आरोप करीत आहे, बिनबुडाचे आंदोलन करीत आहे. काहीही करून मोदी सरकार पाडायचे आणि केंद्रातली सत्ता हस्तगत करायची, एवढाच राहुल गांधींचा एककलमी कार्यक्रम दिसतो आहे. ed cbi मोदी चर्चा करायला घाबरतात असा आरोप करून काम भागायचे नाही. जर अदानींनी देशाची फसवणूक केली असेल तर ती कशी केली याचे पुरावे संसदेत सादर करण्याची राहुल गांधी यांना संधी आहे. आपल्याला स्मरत असेल की, बोफोर्स घोटाळ्यासंबंधीचे सर्व पुरावे असलेले दस्तावेज विश्वनाथ प्रतापसिंग यांनी १५ नोव्हेंबर १९८८ रोजी लोकसभेत सादर केले होते. ed cbi पण, आज राहुल गांधी व अन्य विरोधक पुरावे सादर करायचे सोडून नुसताच गदारोळ करीत आहेत, संसदेचे कामकाज ठप्प पाडून जनतेच्या कोट्यवधी रुपयांचा चुराडा करीत आहेत. देशवासीय हे सगळे उघड्या डोळ्यांनी पाहतो आहे. ed cbi त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीत यश मिळवायचे असेल तर नुसताच धुमाकूळ घालणे राहुल गांधी यांनी बंद केले पाहिजे. अन्यथा, निकाल काय लागणार हे वेगळे सांगण्याची गरज नाही.
 
 
ed cbi बोफोर्सच्या तोफा घेऊनच तर आम्ही कारगिलचे युद्ध जिंकले होते असे सांगत घोटाळ्यावर पांघरूण घालण्याचे प्रयत्न काँग्रेसकडून सुरू आहेत. बोफोर्सचा तपास तर झालाच नाही. त्यात काही निघालेच नाही, असे सांगत दिशाभूलही केली जात आहे. ज्याप्रमाणे विश्वनाथ प्रतापसिंग यांनी बोफोर्सचे प्रकरण लावून धरत राजीव गांधींचे सरकार घालवले होते, तसेच अदानींचे प्रकरण उचलून धरत मोदी सरकार आपण घालवू शकतो आणि म्हणूनच २०२४ च्या निवडणुकीपर्यंत अदानी प्रकरणावर गदारोळ करत राहायचा, आरोपांची राळ उडवत राहायचे, असा उफराटा सल्ला राहुल गांधींभोवतीची चौकडी त्यांना देत आहे. ed cbi पण, चौकीदाराला चोर म्हटल्याचे काय परिणाम झालेत, याचा विसर त्यांना पडलेला दिसतो आहे. ज्या प्रकरणात काही दम नाही, पुरावे उपलब्ध नाहीत, ते प्रकरण तुम्ही किती दिवस रेटणार आहात? राफेलच्या मुद्यावर निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करताना तुम्ही तोंडावर आपटला होतात, हे विसरलात का? राफेल प्रकरणात जे आरोप राहुल यांनी केले होते, त्यासंबंधी एकही पुरावा ते देऊ शकले नव्हते आणि शेवटी सुप्रीम कोर्टाने जेव्हा निकाल दिला, तेव्हा पुन्हा थोबाडीत बसली होती, याचाही विसर पडावा, याचेही आता आश्चर्य वाटत नाही. ed cbi कारण, राहुल आणि त्यांच्या साथीदारांनी काँग्रेस विसर्जित करण्याची महात्मा गांधी यांची सूचना गंभीरपणे अंमलात आणण्याचे मनावर घेतले आहे, हे त्यांच्या वर्तणुकीवरून स्पष्ट दिसते आहे.
 
 
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीआधीच भाजपाने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले होते. त्याआधी ते भाजपाच्या निवडणूक प्रचाराचे प्रमुख होते. देशभर प्रचार सभा घेतानाच त्यांनी सांगितले होते की, ना खाऊंगा ना खाने दूंगा! त्यामुळेच विरोधक चवताळले आहेत. ed cbi अनेकांची अनेक प्रकारची दुकानं बंद झाली आहेत. ed cbi आवक बंद झाल्याने अस्वस्थ असलेले राजकीय नेते मोदींना हुकूमशहा म्हणत आहेत, त्यांच्यामुळे लोकशाही धोक्यात आल्याचा कांगावा करीत आहेत, हे स्पष्ट आहे. मोदींच्या सत्ताकाळात राजकीय नेत्यांच्या भ्रष्टाचाराच्या जेवढ्या चौकशा होत आहेत, तेवढ्या याआधी कधी झाल्या नव्हत्या. किती तथ्य आहे माहिती नाही, पण असे सांगितले जाते की, राजकीय नेत्यांमध्ये एक अघोषित समझोता झालेला होता. तुम्ही आमची प्रकरणे बाहेर काढू नका, आम्ही तुमची बाहेर काढणार नाही. ed cbi याउलट, पंतप्रधानपद सांभाळताच मोदींनी स्वच्छ भारत अभियान सुरू केले आणि या अभियानात भ्रष्टाचार समूळ नष्ट करण्याची बाब समाविष्ट केली. जे भ्रष्ट लोक होते, त्यांनी मोदींच्या म्हणण्याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. त्यांना वाटले की हे नुसतेच बोलतात. ed cbi पण, मोदींनी भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचा-यांवर प्रहार करण्यास सुरुवात करताच यांचे धाबे दणाणले आणि असेच सुरू राहिले तर आपण संपू, आपला पक्षही संपेल आणि सत्तेची फळे पुन्हा कधी चाखायलाच मिळणार नाहीत, ही भीती त्यांना सतावू लागली. ed cbi या भीतीतूनच सगळे विरोधक एकट्या मोदींविरुद्ध एकवटले आहेत, हेही एव्हाना स्पष्ट झाले आहे.
 
 
 
ed cbi देशाच्या राजकारणात आज मोठी गंमत पाहायला मिळत आहे. परस्परविरोधी विचारांचे विरोधी पक्ष मोदींविरुद्ध एकवटले आहेत. ही किमया साधली आहे ईडी आणि सीबीआयसारख्या तपास यंत्रणांनी! जे राजकीय पक्ष कधीच एकमेकांना जवळ करत नव्हते, ते आज तपास यंत्रणांनी भ्रष्टाचाराविरुद्ध सुरू केलेल्या चौकशीविरुद्ध एकत्र आले आहेत. भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमधून स्वत:ची सुटका करवून घेण्यासाठी गळाभेट घेत आहेत. ed cbi आपल्या अस्तित्वावरच संकट आल्याची भीती त्यांना सतावत आहे. ते घाबरले आहेत, कमालीचे घाबरले आहेत. मोदी सरकारच्या भूमिकेमुळे घाबरलेल्या विरोधकांना आणखी घाबरवले ते सुप्रीम कोर्टाने! उच्च न्यायालये आणि त्याखालच्या सर्व न्यायालयांनी भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये कठोर भूमिका घ्यावी, असा आदेशच सुप्रीम कोर्टाने दिल्याने भ्रष्ट विरोधकांचे धाबे दणाणले नसते तरच नवल. ed cbi त्यातूनच त्यांनी मोदींवर आरोप करायला सुरुवात केली. फक्त विरोधी नेत्यांच्या मागेच ईडी आणि सीबीआय का लागते आणि मोदी सरकार या यंत्रणांचा दुरुपयोग करते आहे. मोदींच्या काळात एवढ्या मोठ्या प्रमाणात चौकशा होत असल्याने विरोधकांना बोंबलायला जागा आहे आणि सामान्य जनतेची दिशाभूल करण्याची सोयही आहे. ed cbi पण, मोदीपूर्वी जी सरकारे होती, विशेषत: काँग्रेसची, त्या सरकारांनी ‘तेरी भी चुप मेरी भी चुप', अशी भूमिका घेतली होती, हे सामान्यांनी लक्षात घेतले पाहिजे.
 
 
शिवाय, ईडीने आजपर्यंत भ्रष्टाचा-यांकडून १ लाख २० हजार कोटी रुपयांचा काळा पैसा जप्त केला आहे. ed cbi अशा परिस्थितीत ते मोदींचा द्वेष करणारच. सडलेली, किडलेली व्यवस्था सुधारण्याचे काम मोदी सरकार करीत आहे. ज्यांनी पाच-सहा दशकं फक्त आणि फक्त देश लुटला आणि स्वत:च्या दहा-बारा पिढ्यांची व्यवस्था केली, त्यांच्या मुळावर मोदी उठले आहेत. ते लोक स्वस्थ कसे बसतील? मोदी देशहितार्थ सगळ्या कारवाया करीत असल्याने सामान्य जनता आश्वस्त आहे. घाबरले ते फक्त भ्रष्ट विरोधी नेते. यंत्रणांचा दुरुपयोग होत असल्याचे रडगाणे विरोधकांकडून केवळ स्वत:च्या बचावासाठीच गायले जाते. काहीही झाले की मी माफी मागणार नाही, असे राहुल गांधी छातीठोकपणे सांगतात. ed cbi म्हणजे सरकारने यांच्या चिथावणीला बळी पडून अटक करायची आणि यांनी सहानुभूती मिळवायचा प्रयत्न करायचा. यांचा डाव कधीच यशस्वी होणार नाही. कारण, मोदी सरकार एकेक पाऊल सावधपणे टाकत आहे. शिवाय, ईडीची कारवाई विरोधकांवरच का, हा यांचा प्रश्न म्हणजे सत्ताधा-यांचीही ईडीची चौकशी करा अशी मागणी करणारा आहे. समजा सरकारने सत्ताधारी असलेल्या नेत्यांच्याही मागे ईडी लावली तर ईडीच्या दुरुपयोगाचा विरोधकांचा आरोप संपुष्टात येईल का? सरकार पक्षपात करत आहे, ही टीकाही थांबेल काय? ed cbi काय, चाललंय काय आपल्या देशात? २००४ ते १४ पर्यंत देशात काँग्रेसप्रणीत संपुआचे सरकार होते. तेव्हा का नाही केल्या भाजपाच्या नेत्यांविरुद्ध ईडी चौकशा? शिवाय, आजही देशात डझनापेक्षा जास्त राज्यांमध्ये गैरभाजपा पक्षांची सरकारे आहेत. तिथे का नाही करत तुम्ही भाजपा नेत्यांची चौकशी? ed cbi कारण, भाजपा नेत्यांविरुद्ध तुमच्याकडे काही पुरावेच नाहीत. असते तर तुम्ही शांत बसला असतात, यावर कुणीच विश्वास ठेवणार नाही.
 
 
 
ed cbi पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपाचे सरकार गेल्या नऊ वर्षांपासून केंद्रात सत्तेवर आहे. या नऊ वर्षांमध्ये मोदींच्या मंत्रिमंडळातील एकाही मंत्र्यावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप लागलेला नाही, हे वास्तव आहे. त्यामुळे, पक्षपाताच्या विरोधकांच्या आरोपात दमच नाही. एकूणात काय, तर काँग्रेस सध्या भ्रष्टाचाराच्या आरोपातून स्वत:ची सुटका करवून घेण्याचा आणि अदानी प्रकरणातून राजकीय संधी शोधण्याच्या केविलवाण्या प्रयत्नात आहे. ed cbi त्यातच राहुल गांधी विदेशात बसलेल्या मंडळींचा, त्यांनी तयार केलेल्या कपोलकल्पित अहवालांचा आधार घेऊन आपल्याच देशाची बदनामीही करीत आहेत. ते इंग्रजांच्या भूमीत जाऊन जे काही बरळले, त्यासाठी त्यांनी देशवासीयांची माफी मागितलीच पाहिजे. शिवाय, पुन्हा असे बोलणार नाही, असे आश्वासनही देशवासीयांना दिले पाहिजे. भारतीय जनता पार्टीने माफीचा लावून धरलेला मुद्दा आता सोडता कामा नये. राहुल गांधी इंग्लंडमध्ये जाऊन जे बोलले त्यासाठी त्यांनी जाहीर माफी मागितलीच पाहिजे. ed cbi माफी मागणार नाही, ही त्यांची मुजोरी आहे. मुजोरी खपवून घेता कामा नये. अन्यथा, उद्या कुणीही उठेल आणि देशाविरुद्ध काहीही बोलेल आणि एक वाईट पायंडा पडेल. असे होऊ नये यासाठी हे प्रकरण कायमचे निकाली काढण्यातच देशाचे हित आहे, हे सगळ्यांनी लक्षात घ्यावे. जाता जाता... ed cbi ईडी आणि सीबीआयच्या कारवायांमुळे घडून आलेले विरोधी ऐक्य किती दिवस टिकेल, हे येणारा काळच सांगेल!