विदर्भात पुढील दोन दिवस पावसाची शक्यता

    दिनांक :18-Mar-2023
Total Views |
मुंबई, 
मागील 24 तासांत राज्यातील काही भागांत मेघगर्जनेसह rainfall पाऊस व गारपीट झाली. आता पुढील दोन दिवस विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांत हलक्या ते गडगडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. या ठिकाणी आकाश अंशतः ढगाल राहील. सोमवारपर्यंत मध्य महाराष्ट्रातील काही भागांत पावसाची शक्यता आहे.
 
 
rainfall
 
नाशिकमधील उमराळे, परभणीतील आवई आणि पूर्णा, नदुरबार आणि धुळेसह राज्यातील काही भागांत rainfall गारपीट झाली असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. मुंबईतील प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवलेल्या अंदाजानुसार, हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्ह्यात गारपीट होण्याची शक्यता आहे. पुढील दोन ते तीन दिवस कमाल तापमानात कोणताही बदल होणार नाही. मात्र, त्यानंतर तापमानात तीन ते पाच अंशांची वाढ होईल. विदर्भात पुढील 48 तासांत कमाल तापमानात दोन ते चार अंशांनी घट होण्याची शक्यता असून, त्यानंतर कोणताही मोठा बदल अपेक्षित नाही.