धारणी तालुक्यातील महादेव नदीला पूर

19 Mar 2023 21:17:08
तभा वृत्तसेवा 
धारणी, 
Mahadev river : रविवारी दुपारी झालेल्या गारपीट व पावसामुळे धारणी तालुक्यातील महादेव नदीला पूर आल्याचेही दृश्य पहायला मिळाले. धारणी तालुक्याचे गिरीस्थान असलेल्या गोलाई गावात रविवारी दुपारी मेघ दाटून आले आणि पहाता पहाता प्रचंड गारपीट झाली.
 
Mahadev river
 
पाऊस इतका आला की, गावाजवळच्या महादेव नदीला (Mahadev river) मोठा पूर आला. पाऊस मुसळधार बरसल्याने चार महिन्यांपासून बंद पडलेला महादेव खोर्‍यातील धबधबा सुरू होऊन त्यातून ओसंडून पाणी वाहू लागले. गारपिटीमुळे मका, हरभरा आणि गव्हाच्या पिकाचे प्रचंड नुकसान झाले. धारणीपासून 55 किमी अंतरावरील गोलाई गावात दुपारी जोरदार गारपीट झाली व सोबतच जोरदार पाऊस पडला. फक्त पावसाळ्यात वाहणारी महादेव नदी असल्यामुळे धबधब्याला अजिबात पाणी नव्हते, परंतु रविवारच्या पावसामुळे नदी दुथडी भरून वाहू लागली व धबधब्यालाही पाणी आले. धबधब्याचे दृश्य पाहण्यासाठी नागरिकांनी व पर्यटकांनी गर्दी केली होती. अवकाळी पावसामुळे महादेव नदीला प्रथमच मोठा पूर आल्याचे गोलाई गावातील नागरिकांनी सांगितले.
 
Powered By Sangraha 9.0