बोरखेडी ग्रामपंचायतचा उल्लेखणीय प्रयोग

    दिनांक :02-Mar-2023
Total Views |
रिसोड,
तालुक्यातील बोरखेडी Borkhedi येथील ग्रामपंचायतने हागणदारी मुक्त मोहीम राबविण्यासाठी घाण कचर्‍याच्या जागेवर स्वच्छता देवता अर्थात संत गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराजांच्या प्रतीमेचे सार्वजनिक पुजन करून ग्रामस्वच्छता अभियानाला प्रारंभ केल्याने हा प्रयोग इतर ग्रामपंचायतीसाठी आदर्श आणि उल्लेखणीय ठरत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील हिरडव येथील ग्रामपंचायतने हागणदरी मुक्तीसाठी थेट घाण कचर्‍याच्या ठिकाणी संत गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराजांसह विविध जाती धर्मातील संताच्या प्रतीमा लावल्याने तेथील हा प्रयोग मोठ्या प्रमाणात यशस्वी झाला. या प्रयोगाचे अनुकरण बोरखेडी ग्रामपंचायतने केला आहे. गावाच्या सरपंच पदी हभप विश्वनाथ महाराज वायभासे आरूढ झाले. त्यानंतर संताच्या विचारसरणीनेच गावातील सर्वांगीण विकासाला चालणा देण्यासाठी पुढाकार घेण्यास प्रारंभ झाला.
  

df454 
 
गावातील उघड्यावर हागणदरीचा त्रास जिल्हा परिषद शाळेला मागील अनेक वर्षांपासून होता. याबाबत शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, आरोग्य विभागातील कर्मचारी ग्रामपंचायतकडे गेले असता सर्वानुमते ग्रामस्वच्छता अभियानाला प्रारंभ झाला. त्यानंतर घाण कचरा असलेल्या मोकळ्या जागेवर Borkhedi स्वच्छता करीत गावातील विद्यार्थ्यांनी व महिलांनी पुढाकार घेत कचर्‍याच्या जागेवर स्वच्छतेचा संदेश देणारे संताचे फोटो लावण्यात आले व आकर्षक रांगोळीव्दारे स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. संत गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराज यांनी आयुष्यभर स्वच्छतेचा संदेश दिला. बोरखेडी येथील घाणीच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या संतांच्या प्रतीमांचा मान राखत ग्रामस्थामध्ये आदरयुक्त भिती निर्माण होऊन ग्राम स्वच्छता अभियानाला हातभार लागत आसल्याने हा प्रयोग अनेक ग्रामपंचायत साठी कौतुकाचा ठरत आहे.