शुक्र ग्रहावर सक्रिय ज्वालामुखी

- नासाने उलगडले आणखी एक रहस्य

    दिनांक :20-Mar-2023
Total Views |
वॉशिंग्टन,
Venus volcanoes : नासाच्या वैज्ञानिकांनी आता आणखी एक रहस्य उलगडले आहे. नासाच्या अंतराळ यानाने काढलेल्या छायाचित्रांतून (Venus volcanoes) शुक्र ग्रहावर ज्वालामुखी सक्रिय असल्याचे पुरावे समोर आले आहेत. नुकतेच नासाच्या मॅगेलन अंतराळयानाने शुक्र ग्रहाच्या पृष्ठभागाची वेगवेगळ्या कक्षेतून छायाचित्रे काढली आहेत. यामध्ये शुक्र ग्रहावर काही ठिकाणी ज्वालामुखीच्या हालचाली दिसल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
 
Venus volcanoes
 
शास्त्रज्ञांना (Venus volcanoes) शुक्र ग्रहावर ज्वालामुखीच्या हालचालीची चिन्हे आढळली आहेत. नासाच्या शास्त्रज्ञांनी नवीन संशोधनानुसार शुक्रवर जागृत ज्वालामुखी असल्याचा अंदाज वर्तवला आहे. वैज्ञानिकांनी अंतराळ मोहिमांमध्ये काढलेल्या 30 वर्षे जुन्या फोटोंचा अभ्यास आणि निरीक्षण केले. दरम्यान, गेल्या एका वर्षाच्या आत ज्वालामुखीच्या आकारात झपाट्याने बदल झाल्याचे नासाच्या शास्त्रज्ञांना आढळून आले आहे.
 
 
शुक्र (Venus volcanoes) हा ग्रह पृथ्वीप्रमाणे आहे. यामुळेच शुक्र ग्रहाला ‘सिस्टर प्लॅनेट’ म्हणजे पृथ्वीची बहीण असेही म्हटले जाते. पृथ्वी आणि शुक्रचा आकार, वस्तुमान, घनता आणि आकारमान यामध्ये खूप समानता आढळते. यामुळेच शुक्र आणि पृथ्वी यांना अनेकदा जुळ्या बहिणी म्हटले जाते. दरम्यान, उपग्रह, अंतराळयान आणि रडार यांच्या दशकांपूर्वीपासून आतापर्यंतच्या छायाचित्रांच्या अभ्यासातून या दोन्ही ग‘हांमध्ये सक्रिय ज्वालामुखी असल्याची समानता आढळली आहे.
 
 
ज्वालामुखीच्या तोंडाच्या आकारात बदल
सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या नवीन संशोधनात असे दिसून आले आहे की, (Venus volcanoes) शुक्र ग्रहावरील 2.2 चौरस किलोमीटरवर पसरलेल्या ज्वालामुखीच्या वेंटच्या आकारात आठ महिन्यांत बदल झाला आहे. यावरून हा ज्वालामुखी सक्रिय असल्याचा अंदाज शास्त्रज्ञांनी वर्तवला आहे. अनेक दशके जुन्या रडार फोटोंचे निरीक्षण आणि अभ्यासात शुक्रवरील सक्रिय ज्वालामुखीचे नवीन पुरावे मिळाले आहेत. शुक्रवरील ज्वालामुखीच्या वेंटच्या आकार गेल्या आठ महिन्यांत मोठा बदल झाला आहे. ज्वालामुखीचा वेंट म्हणजे ज्वालामुखीचे तोंड, ज्यामधून लाव्हा बाहेर वाहतो.
 
लाव्हा बाहेर पडल्याचे पुरावे
रडार फोटोंच्या अभ्यासानुसार, ज्वालामुखीमधून लाव्हा बाहेर पडण्याची चिन्हे दिसून आली आहेत. फोटोंमध्ये ज्वालामुखीच्या तोंडाचा आकार दुप्पट झाला होता आणि लाव्हाही ज्वालामुखीच्या तोंडाच्या अगदी जवळ पोहोचला होता. शुक्रवरील माट मॉन्स या ज्वालामुखीमध्ये हा बदल आढळला आहे. माट मॉन्स हा (Venus volcanoes) शुक्र ग्रहावरील दुसरा सर्वांत उंच ज्वालामुखी आहे. शुक्रच्या विषुववृत्ताजवळील या ज्वालामुखीच्या आकारत झालेला बदल म्हणजे हा ज्वालामुखी सकि‘य असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे.