अमिताभ बच्चन यांनी मानले चाहत्यांचे आभार

- अपघातानंतर दिली तब्येतीची माहिती

    दिनांक :20-Mar-2023
Total Views |
मुंबई,
काही दिवसांपूर्वी महानायक (Amitabh Bachchan) अमिताभ बच्चन त्यांच्या आगामी ‘प्रोजेक्ट के’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान हैदराबादमध्ये जखमी झाले होते. याविषयी त्यांनी त्यांच्या ब्लॉगवर माहिती दिली होती. त्यावर त्यांच्या चाहत्यांनी, ते लवकर बरे व्हावेत, यासाठी प्रार्थना केली. आता दुखापतीतून बरे झाल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी शुभचिंतकांची चिंता आणि प्रार्थनांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यांच्या अपघाताची बातमी ऐकल्यानंतर त्याच्या चाहत्यांना धक्काच बसला होता. सर्वच जण त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करीत होते. याच ब्लॉगमध्ये त्यांनी सांगतिले होते की, ते सध्या त्यांच्या मुंबईतील घरी विश्रांती घेत आहेत.
 
Amitabh Bachchan
 
त्यांनतर बिग बीं पुन्हा ब्लॉग शेअर केला आणि लिहिले की, ‘मला झालेल्या अपघाताविषयी ज्या लोकांनी चिंता व्यक्त केली, माझ्यासाठी प्रार्थना केली त्या सर्वांचे मी आभार मानतो. ज्या पद्धतीने तुम्ही सर्व माझ्यासाठी हळवे होता, हे पाहून मी खरेच खूप भावुक झालो आहे. डॉक्टरांनी जे काही सांगितले,त्याचे मी खूप काटेकोरपणे पालन करीत आहे.’ आता (Amitabh Bachchan) बच्चन यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. त्यांनी नुकतीच समाज माध्यमावर पोस्ट शेअर करीत पुन्हा त्याच्या आरोग्याविषयी माहिती दिली. त्यांचा फोटो सामायिक करीत लिहिले की, ‘माझ्या प्रकृतीसाठी सर्व प्रार्थना आणि शुभेच्छांसाठी धन्यवाद. मी दुरुस्त होतोय्. लवकरच रॅम्पवर परत येईल, अशी आशा आहे.’