चैत्र नवरात्र 21 की 22 मार्चला?...वाचा योग्य माहिती
20 Mar 2023 09:00:12
Chaitra Navratri हिंदू चंद्र कॅलेंडरचा पहिला महिना चैत्र म्हणून ओळखला जातो आणि म्हणून या वेळच्या नवरात्रीला चैत्र नवरात्री म्हणून ओळखले जाते. या उत्सवादरम्यान देवी दुर्गा आणि तिच्या विविध अवतारांची पूजा केली जाते. नवरात्रीच्या नवव्या दिवशी भगवान रामाचा जन्मदिवस रामनवमी म्हणून ओळखला जातो. या वर्षी चैत्र नवरात्रीच्या तारखेबाबत संभ्रम आहे. काहींचा दावा आहे की, ती 21 मार्चपासून सुरू होईल, तर काही म्हणतात की, ती 22 मार्च आहे. या वर्षी चैत्र नवरात्र कधी सुरू होत आहे आणि कलश स्थापनेचा शुभ मुहूर्त कोणता आणि नवरात्रीचे 9 शुभ रंग आणि त्याचे महत्त्व जाणून घ्या. चैत्र नवरात्र हा नऊ दिवस चालणारा सण आहे, यावेळी Chaitra Navratri चैत्र नवरात्रीच्या तारखेबाबत संभ्रम आहे कारण चैत्र महिन्याची प्रतिपदा तारीख 21 मार्च रोजी रात्री 10:52 वाजता सुरू होत आहे. अशा परिस्थितीत चैत्र नवरात्र 21 मार्चपासून सुरू होणार की 22 मार्चपासून याबाबत लोक संभ्रमात आहेत.