अभिनेत्रीने चित्रपटाच्या टीमला वाटली सोन्याची नाणी

    दिनांक :21-Mar-2023
Total Views |
हैदराबाद, 
कीर्ती सुरेश (Actress Keerthy Suresh) ही लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री आहे. ती दाक्षिणात्य चित्रपटात दिसत असली तरी, तिचा चाहता वर्ग हा बराच मोठा आणि जगभर पसरला आहे. कीर्ती तिच्या ‘दसरा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या सेटवर कीर्तीने असे काही केले की, तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
 
Actress Keerthy Suresh
 
कीर्ती सुरेश (Actress Keerthy Suresh) तिच्या ‘दसरा’ चित्रपटातील कामगिरीने इतकी खूश झाली की, तिने प्रत्येकी 10 ग्रामची 130 सोन्याची नाणी चित्रपटाच्या टीमला वाटली. कीर्तीला वाटले की, तिने ‘दसरा’मध्ये तिच्या कारकीर्दीचा सर्वोत्तम परफॉर्मन्स देणार्‍या लोकांसाठी काहीतरी खास करावे. इतकेच नाही तर, चित्रपटाच्या शुटिंगच्या शेवटच्या दिवशी ती खूप भावुक झाली होती. त्यानंतर तिने चित्रपटाच्या टीमला सोन्याची नाणी वाटण्याचा निर्णय घेतला. तिने चित्रपटाच्या टीमला 70-75 लाखांची सोन्याची नाणी वाटली.