ग्रामपंचायत सदस्यांना मानधन द्या

21 Mar 2023 19:19:36
तभा वृत्तसेवा 
देवरी, 
Gram Panchayat members : त्रिसूत्री पंचायत राज व्यवस्थेत ग्रामपंचायत सदस्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे ग्राम विकासात महत्वाची भूमिका बजावणार्‍या ग्रामपंचायत सदस्यांना मानधन लागू करण्यात यावे, या मागणीसह विविध मागणीचे निवेदन उपसरपंच व सदस्य संघटनेच्या वतीने आ. सहषराम कोरोटे यांना देण्यात आले.
 
Gram Panchayat members
 
आ. कोरोटे यांच्या देवरी येथील निवासस्थानी 19 मार्च रोजी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी भेट देऊन आपल्या मागण्या शासन दरबारी मांडण्याची मागणी निवेदनातून केली. निवेदनात उपसरपंचांच्या मानधनात वाढ करण्यात यावी, नक्षल भागचा विकास निधी नक्षल भागातच खर्च करण्यात यावा, ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारात उपसरपंचाचीही सहमती व स्वाक्षरी आवश्यक करण्यात यावी, ग्रामपंचायत सदस्यांना मानधन लागू करण्यात यावे, आदी मागण्यांचा समावेश आहे. यावेळी आ. कोरोटे यांनी उपसरपंच व सदस्य संघटनेची मागणी शासन दरबारी मांडण्याचे आश्वासन दिले. निवेदन देतानस संघटनेचे सचिव देवेंद्र हटिले, उपाध्यक्ष उमेश चुटे, कोषाध्यक्ष ललीत मच्छिरके, श्याम मेश्राम, जितेंद्र अग्रवाल, बुधराम जिंदाकूर, राजकुमार थेर, गणराज कोरोटे, संतोष राऊत, गेंदलाल रत्नाकर आदी उपस्थित होते.
 
Powered By Sangraha 9.0