जिओ ट्रू 5G आता वर्धा आणि भंडाऱ्यात !

Jio true 5-G जिओ ठरला पहिलाच ऑपरेटर

    दिनांक :21-Mar-2023
Total Views |
मुंबई, 
 
Jio true 5-G विदर्भातील भंडारा आणि वर्धा ही दोन शहर आज जिओ ट्रू 5G नेटवर्क शी जोडले गेले. याच वेळी 16 राज्यातील 41 शहर आज जिओ ट्रू 5G नेटवर्क शी जोडली गेली. तसेच 5G उपलब्ध असलेल्या शहरांची संख्या आता 406 झाली आहे. वJio true 5-G र्धा आणि भंडारा व्यतिरिक्त जिओ ची ट्रू 5G सेवा पुणे, नागपुर, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, सातारा, सांगली, इचलकरंजी,अमरावती, अकोला, चंद्रपूर, जळगाव, धुळे, जालना, मालेगाव, चाकण, सोलापूर, बीड, परभणी, लातूर, अहमदनगर येथे उपलब्ध आहे.
 

5 g 
 
Jio true 5-G याप्रसंगी बोलताना जिओच्या प्रवक्त्याने सांगितले की, “वर्धा आणि भंडाऱ्यामध्ये मध्ये जिओ ची 5G सेवा सादर करताना आम्हाला आनंद होत असून या दोन्ही शहरात 5G सेवा सुरू करणारा जिओ हा पहिलाच ऑपरेटर आहे.'' जिओ ट्रू 5G तंत्रज्ञान त्याच्या विश्वसनीय वायरलेस नेटवर्कसह विदर्भ आणि महाराष्ट्रातील लोकांना प्रगत आरोग्य सेवेच्या क्षेत्रात फायदा होणार आहे. Jio true 5-G
 
 
कृषी, शिक्षण, ई-सुशासन, माहिती तंत्रज्ञान, लघु आणि मध्यम उद्योग, ऑटोमेशन, कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स), गेमिंग आणि इतर अनेक क्षेत्रातही अनेक फायदे मिळतील. Digital Maharashtra महाराष्ट्र डिजीटल करण्यासाठी आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल आम्ही महाराष्ट्र सरकारचे आभारी आहोत, असे कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले. जिओ ट्रू 5G सेवा मिळवण्यासाठी ग्राहकांना त्यांचे सिम कार्ड बदलण्याची गरज नाही. Jio true 5-G त्यांना एक जिओ 5G नेटवर्क सुसंगत 5G हँडसेट, राहत्या किंवा कामाच्या ठिकाणी 5G नेटवर्कची उपलब्धता असणे आवश्यक असेल.