श्रीनगर,
राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) मंगळवारी काश्मिरी (Journalist Irfan Mehraj) पत्रकार इरफान मेहराजला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एनआयएच्या विशेष पथकाने श्रीनगरमधील मेहजूर नगरमध्ये राहणारा स्वतंत्र पत्रकार इरफान मेहराज याला अटक केली.अधिकृत सूत्रांनी मेहराजच्या अटकेची पुष्टी केली आणि सांगितले की, एनआयए दिल्ली येथे नोंदवलेल्या एफआयआर क्रमांक RC-37/2020 च्या संदर्भात NIA कडून चौकशीसाठी त्याला अटक करण्यात आली आहे. यापूर्वीही याप्रकरणी इरफानची चौकशी करण्यात आली होती.
माहितीनुसार, केंद्र सरकारला विश्वासार्ह माहिती मिळाली होती की, नोंदणीकृत आणि (Journalist Irfan Mehraj) नोंदणीकृत नसलेल्या काही स्वयंसेवी संस्था, ट्रस्ट आणि सोसायटी देणग्या, व्यावसायिक योगदान याद्वारे आरोग्य, शिक्षण इत्यादी विविध कल्याणकारी उपक्रमांमधून सार्वजनिकरित्या निधी गोळा करत आहेत. यातील काही स्वयंसेवी संस्थांचे लष्कर-ए-तैयबा (एलईटी), हिजबुल-मुजाहिदीन (एचएम) इत्यादी प्रतिबंधित दहशतवादी संघटनांशी संबंध आहेत.
पुढे अशा एनजीओ, ट्रस्ट आणि सोसायट्यांद्वारे गोळा केलेला निधी (Journalist Irfan Mehraj) काश्मीर खोऱ्यातील फुटीरतावादी आणि दहशतवादी कारवाया चालू ठेवण्यासाठी दिल्ली, जम्मू आणि काश्मीर आणि भारताच्या इतर भागात कॅश कुरिअर, हवाला व्यापाऱ्यांद्वारे जम्मू आणि काश्मीरमध्ये पाठविला जातो. भारताची एकता, अखंडता, सार्वभौमत्व आणि सुरक्षेला हा धोका आहे. माहितीनुसार, या एनजीओ, ट्रस्ट, सोसायटी आणि त्यांचे सदस्य भारत सरकारबद्दल द्वेष, तिरस्कार आणि असंतोष पसरवण्यासाठी तोंडी आणि लेखी माध्यमातून देशविरोधी आणि आक्षेपार्ह साहित्य प्रकाशित करतात.