माळशेज घाटात 15 पर्यटक अडकले

    दिनांक :21-Mar-2023
Total Views |
- खोल दरीत कोसळून एकाचा मृत्यू
 
पुणे, 
पुण्यात Malshej Ghat माळशेज घाटात नाशिकहून आलेले 15 पर्यटक अडकून पडले आहेत. त्यातील एका ट्रेकरचा खोल दरीत पडून मृत्यू झाला. अडकलेल्या 15 पैकी 6 जण दरीत अडकले होते. त्यातील 5 जणांना वाचवण्यात आले आहे. किरण काळे असे मृत्युमुखी पडलेल्या ट्रेकरचे नाव आहे. नैसर्गिक सौंदर्याने पुण्यातील जुन्नर तालुक्यातील माळशेज घाट हा नटलेला आहे. येथील डोंगर रांगा राज्यभरातील ट्रेकर्सला खुणावत असतात.
 
 
Malshej Ghat
 
असाच नाशिकहून 15 जणांच्या ट्रेकर्सचा ग्रुप हा Malshej Ghat माळशेज घाटात ट्रेकिंगसाठी आला होता. यातील सहा जणांचा ग्रुप हा दरीत अडकून पडला होता. यातील एका ट्रेकरचा खोल दरीत कोसळून मृत्यू झाला. तर इतर पाच ट्रेकर दरीत अडकून पडले होते. याची माहिती जुन्नर येथील शिवनेरी टेकर्स रेस्क्यू टीम पथकाला रविवारी दुपारी समजली. पथकातील सदस्यांनी घटनास्थळी जाऊन ट्रेकर्सला बाहेर काढण्यासाठी दिवसभर प्रयत्न केले. 100 फूट खोल दरीत अडकलेल्या 14 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात पथकाला यश आले. दरम्यान, त्यांच्यातील एक जण बेपत्ता असल्याचे समजल्याने त्यांनी पुन्हा शोध मोहीम राबवली. एक ते दोन तास शोध घेतल्यावर त्या युवकाचा मृतदेह आढळून आला. अडकलेल्या सर्व ट्रेकर्सना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.