आजचे राशीभविष्य दिनांक २१ मार्च २०२३

    दिनांक :21-Mar-2023
Total Views |

Rashi
 
 
मेष (Aries Rashi )
आजच्या दिवशी मोठी जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. मानसिक चढउतार अनुभवायला मिळू शकतो, त्यामुळे काळजी घ्या.
वृषभ (Taurus)
आजच्या दिवशी नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने प्रवास होऊ शक्यता आहे. एखादी चांगली बातमी कानावर पडू शकते. दिवस खूप बिझी असणार आहे.
मिथुन (Gemini Rashi )
आजच्या दिवशी कोर्टकचेरीचे एखादे प्रकरण उद्भवण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. ऑफिसमध्ये तुम्ही करत असलेल्या कामाची तपासणी होऊ शकते.
 
कर्क (Cancer)
आजच्या दिवशी नोकरी किंवा व्यवसायामध्ये अडचणी वाढू शक्यता आहे. पैशांच्या बाबतीत सतर्क राहावं लागणार आहे, फसवणूक होऊ शकते.
 
सिंह (Leo Rashi )
आजचा दिवस धावपळीचा राहणार आहे. आराम केला नाहीत तर त्रास होऊ शक्यता आहे. विचार केलेली कामे पूर्ण न झाल्याने तुमचा मूड खराब होऊ शकतो.
 
कन्या (Virgo)
आजच्या दिवशी महागड्या वस्तूंची खरेदी करण्याचे योग आहेत. वाद विवादामध्ये अडकून राहू नका. कोणावरही तुमच्या भावना जबरदस्ती लादू नका.
 
तूळ (Libra Rashi )
या राशीच्या व्यक्ती कोणता तरी नवा आणि मोठा निर्णय घेऊ शकतील. मनात नसतानाही पैसे खर्च होऊ शकतात.
 
वृश्चिक (Scorpio)
आजच्या दिवशी साथीदाराकडून तुम्हाला खास वागणूक मिळणार आहे. अनेक गोष्टी शिकण्याची संधी मिळू शकते, त्याचा लाभ घ्या.
 
धनु (Sagittarius Rashi )
आजच्या दिवशी मनाच्या जवळची व्यक्ती तुम्हाला भेटणार आहे. ठरवलेली काम सहज पूर्ण होण्याचे योग आहेत. कोणती तरी चांगली बातमी मिळणार आहे.
 
मकर (Capricorn)
आजच्या दिवशी तुमच्या मनात काही मोठे विचार येणार आहेत. गुंतवणूक करण्यापूर्वी सल्ला घेऊनच निर्णय घेणं फायदेशीर ठरणार आहे.
 
कुंभ (Aquarius Rashi )
आजच्या दिवशी जोडीदाराशी तुमचे संबंध चांगले राहणार आहेत. यापूर्वी केलेल्या कामांचा फायदा मिळू शकणार आहे.
 
मीन (Pisces)
आजच्या दिवशी नातेवाईकांची मदत देखील तुम्हाला होणार आहे. नोकरीमध्ये नवे काम मिळण्याचे योग आहेत.