चैत्र गुढी आणि चैत्रगौरी !

chaitra navratri सकल श्रुती तिला वंदन करतात

    दिनांक :21-Mar-2023
Total Views |
साहित्य-संस्कृती 
- डॉ. नंदिनी कडुस्कर
 
chaitra navratri उत्तम हा चैत्र मास। ऋतु वसंताचा दिस।
शुक्ल पक्षी ही नवमी । उभे सुरवर ते व्योमी।। - नामदेव गाथा
चैत्र महिन्यापासून मराठी वर्ष सुरू होते. महिन्याला जी नावे ज्योतिषशास्त्राने दिली आहेत; त्याला कारण चंद्र आणि नक्षत्र होय. प्रत्येक महिन्याचा पौर्णिमेचा चंद्र ज्या नक्षत्रांमधून उगवलेला दिसतो त्या नक्षत्राचे नाव त्या महिन्याला मिळते. chaitra navratri चित्रा नक्षत्र पौर्णिमेच्या साहचर्याला आले असल्याने चित्रावरून चैत्र हे नाव या महिन्याला प्राप्त झाले आहे. चित्रा नक्षत्र फार देखणे आहे. या नक्षत्रातून चंद्र जात असताना भूमीचेही रूप मनोहारी असते. दत्तावतारी श्रीपाद श्रीवल्लभांचे ते फार आवडते नक्षत्र आहे.
फुटे तरुवर उष्णकाळमासी। जीवन तयासी कोण घाली।। chaitra navratri 
गिरी, कंदरात, इकडे, तिकडे, चहूकडे छोट्या मोठ्या वृक्षांना कुणी पाणी घालत नसूनही छान हिरवी पालवी फुटत असते. मोहाला, पळसाला लाल रंगांची फुले आणि विविध झाडांना रंगबिरंगी फुलांचा बहर आलेला असतो. वसंत ऋतू आधीच आल्याने सगळीकडे कसे नवं चैतन्य असते. विविध फुलांनी केलेली रंगांची उधळण पाहायला मिळते. chaitra navratri थंडी संपलेली आणि दिवसागणीक वाढत असलेली उष्णता हा ऋतू बदलाचा परिणाम सर्वांना हवाहवासा वाटतो.
 
 
chait
 
नवं चैतन्याने भरलेला आसमंत आणि ऊर्वरेने नवनिर्मितीचा चढविलेला साज व त्याला मिळालेली (सूर्याच्या मेष राशीत नव्याने पदार्पण करून ऊर्जेत केलेली वाढ) ऊर्जेची जोड मिळून वातावरणात आनंद निर्माण झालेला असतो. सूर्याच्या ऊर्जा वाढीने जमीन चांगली तापून निघते. chaitra navratri अशा तापलेल्या भूमीतूनच अन्न, धान्ये, फळे, भाजीपाला सकस रुचकर व भरपूर निघत असतो. याच कारणाने पृथ्वीच्या नवनिर्मितीचे व सूर्याच्या ऊर्जेच्या विकासाचे स्वागत करण्यासाठी गुढी उभारली जाते आणि आम्रपल्लवांचे तोरण घराघरांना, मंदिरांना लावले जाते. अंगणात चैत्रांगण रंगावली काढली जाते. ऊध्र्वदिशेकडे उभारलेली गुढी व गुढीसाठी वापरलेल्या काठीचे एक टोक पृथ्वीला टेकलेले जे असते; ते सूर्याशी पृथ्वीचे नाते कसे घट्ट असते; संबंध कसा अन्योन्य आहे, हेच दाखवत असते. या गुढीपाडव्यापासून पाडवा म्हणजे प्रतिपदा पुढे सगळंच कसं नवीन असतं. chaitra navratri संवत्सर; या संवत्सराचे नाव ‘शोभन' हे आहे. म्हणजे वर्ष प्रारंभ, विविध कार्यांचा प्रारंभ करण्यासाठी साडेतीन मुहूर्तांपैकी पहिला मुहूर्त म्हणजे चैत्र पाडवा होय. कार्य प्रारंभ, पंधरवडा, अमावास्या, पौर्णिमा, शुक्लपक्ष, कृष्णपक्ष, मास, अयन, वर्षे, युगाब्ध यांच्या गणनेचा प्रारंभ या दिवसाने करण्याचा प्रघात आपल्या भारतीय ज्योतिर्विदांनी सुरू केला; तसा तो आजतागायत सुरू आहे.
 
 
 
chaitra navratri या दिवशी पुढील काळात वर्षभर पीक, पाणी, हवामान, आर्थिक, राजकीय, सामाजिक बदल कसे होतील, याचे भविष्य जे पंचांगात लिहून ठेवलेले असते; ते, पंचांगाची पूजा करून ऐकायचे असते किंवा ऐकून घ्यायचे असते. वर्षाचा पहिला दिवस आनंदात गेला की, पुढील काळही आनंदात जातो- ‘सस्यं सर्व सुखंच वत्सरफलं संश्रृण्वतां सिद्धीम।' असं सबंध संवत्सराचं भविष्य ऐकण्याचं फलित मिळतं, असं धर्मशास्त्र सांगते. chaitra navratri नवा साज धारण करणारा निसर्ग म्हणजे अष्टधा प्रकृती; तिचेच रूप ‘अवनी' तीच जगत्जननी तीच भगवती आहे. तीच सर्व ब्रह्मांडाचा कार्यभाग चालविते. ऋषिमुनी आणि संतांनी तिला ‘सर्वाद्या सर्वशक्तिः।' हिलाच परमात्म्याची अर्धांगिनी म्हटले आहे. विविध काळी विविध रूपाने ही अवतार धारण करून ‘परित्राणाय साधूनां विनाशायच दुष्कृताम्।' हे कार्य करण्यासाठी येत असते. chaitra navratri कधी परमात्म्याला, त्याच्या लीला विग्रहाला- रामाची सीता, शंभूची गौरी, मल्हारी मार्तंडाची म्हाळसा इत्यादी रूपाने ती साह्यभूत होते. कधी स्वतःच चामुंडा, दुर्गा, शाकंभरी, कमला, रेणुका, सीता, द्रौपदी, काली अशी रूपे घेऊन जगाचे कल्याण कार्य करिते.
हीच गोष्ट तुलसीदास महाराज सांगतात-
‘जासु अंश उपजही गुणखानी। अगणित उमा, रमा ब्रह्माणी।।
भृकुटी विलास जासु जग होई। राम वाम दिसी सीता होई।।'
 
 
सकल श्रुती तिला वंदन करतात. चैत्रात तिचे पूजन प्रथम गौरी रूपाचे; नंतर याच महिन्यात रामाची सीता रूपाचे होते.
चैत्रापर्यंत निघालेल्या धान्याचा, चणे, आंबा, फणस, विविध फुले यांचा पूजा साहित्य म्हणून वापर करतात. chaitra navratri जगदंबेचे मूर्त रूप ‘स्त्री' असे समजून सुवासिनी स्त्रिया सुवासिनींचा हळद-कुंकू लावून, आंबेडाळ खायला घालून, पन्हे देऊन आदर करतात. ओलावलेल्या चण्यांनी ओटी भरतात. थोडक्यात जगदंबेच्या कृपेनेच आमचे जीवन चांगले चालले आहे; यासाठी तिचे आभार व्यक्त करणे व तिचे उतराई होणे यासाठी केलेली ही प्रकृतीची पूजाच होय. रावणासारख्या दुष्टाला मारून जगतकल्याणाचे कार्य करून राम अयोध्येला परत आले असता लोकांना जो हर्ष झाला होता, तो गुढ्या उभारून त्यांनी व्यक्त केला. म्हणून ही गुढी हर्षाचीही आहे. ‘रावणाला मारण्यासाठी सीताकारणभूत ठरली.' सीता देवी कोण आहेत? हे आपल्या शिष्याला समजावून सांगताना सुतीक्ष्णाला अगस्ती ऋषी म्हणतात- श्री विष्णूंचा विग्रह म्हणजे अवतार- हा राम आहे. chaitra navratri त्या रामाची पत्नी होऊन विष्णुपत्नी महालक्ष्मी आली. त्याच महालक्ष्मीचा ‘सीता' हा ऐश्वर्यरूप - माधुर्यविग्रह आहे. हीच जानकी आपल्या अंशाद्वारे अनेकानेक जगताची उत्पत्ती करून त्यात तेज निर्माण करून प्रादुर्भूत होत असते. chaitra navratri
‘उद्भव स्थितिसंहारकारिणि क्लेष हारिणिम्।
सर्व श्रेयस्करिं सीता नतोऽहं रामवल्लभाम्।।'
 
 
chaitra navratri अगस्ती म्हणतात सुतीक्ष्णाला- ही सीता असीम वात्सल्य रसपूर्णा आहे . तिनेच मारुतीला आपला वत्स मानून ज्ञान दिले. ती गौरकांती, तेजसंपन्ना, परम क्षमासंपन्ना, कमलनयना, भगवत्प्रिया आणि जगताची आधारशक्ती आहे. आपल्यालाही तीच ‘मोक्ष' प्रदान करेल. हीच भगवती आपल्या लेकरांच्या कल्याणाच्या विचाराने तिची डोळ्याची पापणी किंचितही लवू न देता निर्निमेष अशी सतत जागृत राहते. chaitra navratri म्हणून प्रत्येक महिन्यात चैत्रापासून फाल्गुनापर्यंत देवीच्या विविध रूपाचं पूजन करणारे उत्सव, नवरात्री, पौर्णिमा येत असतात. त्या दिवसात त्या काळी होऊन गेलेल्या तिच्या रूपाचे पूजन करून तिचे आभार व्यक्त करणे व तिची प्रसादस्तु प्रसन्नता प्राप्त करणे हे आपले कर्तव्य आहे, असे भारतीय संस्कृतीतील प्रत्येक माणूस समजत आला आहे. chaitra navratri याच कारणाने चैत्रापासून प्रत्येक महिन्यात, ऋतूत जगत्जननी प्रकृतीचे व परमात्म्याचे पूजन आपण करतो व प्रत्येक भारतीयाला त्याने समाधान मिळते. हीच भारतीय संस्कृती आहे.
 
 ९४२१७०१५६२