बिल्किस बानोच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी!

    दिनांक :22-Mar-2023
Total Views |
नवी दिल्ली,  
बिल्किस बानो Bilkis Bano  प्रकरणात सुटका होणाऱ्या दोषींच्या अडचणी वाढू शकतात. सर्वोच्च न्यायालयाने दोषींच्या मुदतपूर्व सुटकेविरोधात दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी करण्यास सहमती दर्शवली आहे. 2002 मध्ये बिल्किस बानोसोबत झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात सर्व 11 दोषींची मुदतपूर्व सुटका करण्यात आली होती. दोषींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली होती परंतु 15 ऑगस्ट 2022 रोजी गुजरातमधील गोध्रा तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या या कैद्यांना गुजरात सरकारने माफी धोरणांतर्गत मुक्त केले. सुटका झालेल्यांपैकी काहींनी 15 वर्षे तर काहींनी 18 वर्षे तुरुंगवास भोगला आहे.
 
 
bhjygh  
 
 
बिल्किस बानो Bilkis Bano  यांनी तिच्या वकील शोभा गुप्ता यांच्यामार्फत दोषींच्या सुटकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती पीएस नरसिम्हा आणि जेबी पार्डीवाला यांच्या खंडपीठाने बिल्किस बानो आणि त्यांच्या वकील शोभा गुप्ता यांना याचिकांवर सुनावणीसाठी नवीन खंडपीठ स्थापन करण्याचे आश्वासन दिले. बिल्किस बानोच्या वकील शोभा गुप्ता यांनी या प्रकरणावर लवकर सुनावणीची गरज असल्याचे सांगितले.