CRPF मध्ये ९२१२ कॉन्स्टेबल पदांची मेगाभरती

22 Mar 2023 18:17:30
नागपूर, 
CRPF Recruitment : केंद्रीय राखीव पोलीस दलाकडून कॉन्स्टेबल पदांच्या मेगाभरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. ९२१२ पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या पदांसाठी पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ एप्रिल २०२३ ठेवण्यात आली आहे.

CRPF Recruitment
 
या भरती प्रक्रियेसाठी किमान शैक्षणिक पात्रता १० वी उत्तीर्ण किंवा संबंधित विषयात आयटीआय (ITI) असणे आवश्यक आहे. शारीरिक पात्रता अट खुल्या प्रवर्गासाठी उंची पुरुष १७० सें.मी., तर महिला १५७ सें.मी. याचप्रमाणे मागासवर्गीय प्रवर्गासाठी उंची पुरुष १६२.५ सें.मी., तर महिलांसाठी १५० सें.मी. असणार आहे. ऑनलाईन अर्ज २७ मार्च २०२३ ते २४ एप्रिल २०२३ या कालावधीत करावे. भरती प्रक्रिये संबंधातील इतर विस्तृत माहिती जाणून घेण्यासाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF Recruitment) अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
 
Powered By Sangraha 9.0