मला कसलीही खंत वाटत नाही : जोकोविच

    दिनांक :22-Mar-2023
Total Views |
बेलग्रेड, 
कोरोनाविरोधी लसीअभावी मी इंडियन वेल्स व मियामी येथील टेनिस स्पर्धा गमावल्याबद्दल कोणत्याही प्रकारची खंत वाटत नाही, असे प्रथम विश्वमानांकित सर्बियाचा नोवाक जोकोविच म्हणाला. 35 वर्षीय (Djokovic) जोकोविचने इंडियन वेल्स व मियामी येथे खेळण्यासाठी विशेष परवानगीसाठी बायडेन सरकारकडे अर्ज केला होता, परंतु तो नाकारण्यात आला. अमेरिकेने सध्या लसीकरण न केलेल्या विदेशी लोकांना देशात प्रवेश करण्यास बंदी घातली आहे.
 
Djokovic
 
सरकारने मे महिन्यात कोरोना आणीबाणीची घोषणा समाप्त केल्यानंतर प्रवेशबंदीचे हे धोरण उठविले जाण्याची अपेक्षा आहे. पश्चाताप तुम्हाला मागे खेचतो व तुम्हाला भुतकाळात जगायला लावतो, हेच मी आयुष्यात शिकलो आहे. मला ते करायचे नाही. काळाच्या गरजेप्रमाणे भविष्याचा विचार करा व एक चांगले भविष्य घडवा, असे तो (Djokovic) म्हणाला. रविवारी इंडियन वेल्सचे विजेतेपद पटकावल्यानंतर कार्लोस अल्काराझने जोकोविचला मागे टाकीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळविले. मला अमेरिकन ओपन स्पर्धेत खेळण्याची परवानगी दिली नाही ही खेदाची गोष्ट आहे. वास्तविक मला परवानगी मिळण्याची आशा होती, असे जोकोविच म्हणाला.