आयपीएलमध्ये नाणेफेकीनंतरही अंतिम एकादश ठरवता येणार

22 Mar 2023 21:43:46
मुंबई, 
आगामी 31 मार्चपासून (IPL New rules) इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या हंगामाला प्रारंभ होणार असून इतर हंगामापेक्षा हा हंगाम वेगळा असणार आहे. आयपीएल 2023 मध्ये अनेक नवीन नियम समाविष्ट केले जात असताना आता एक मोठा नियम लागू होणार असल्याची माहिती आहे. दक्षिण आफ्रिका लीगमधून घेतलेल्या या नियमानुसार आगामी आयपीएल हंगामात नाणेफेक पूर्ण झाल्यानंतर संघांना अंतिम एकादशची घोषणा करण्याची मुभा देण्यात आली आहे.
 
IPL New rules
 
सद्यस्थितीला नाणेफेक होताच त्याच ठिकाणी (IPL New rules) अंतिम 11 खेळाडूंचा संघ जाहीर करावा लागतो. पण नवीन नियमामुळे संघाला नाणेफेकीच्या आधारावर आपल्या अंतिम एकादशमध्ये फेरबदल करण्याची संधी मिळाली आहे. बीसीसीआयने इम्पॅक्ट प्लेयर नियमाव्यतिरिक्त नवीन हंगामासाठी केलेल्या अनेक नवीन नियमांपैकी हा एक आहे.
 
 
बीसीसीआयने (IPL New rules) आयपीएल 2023 खेळण्याच्या अटींमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. आयपीएल 2023 च्या नव्या नियमानुसार नाणेफेकीचा निकाल जाणून घेतल्यानंतर कर्णधारांना त्यांची संघ निवडण्याची परवानगी देण्यात आली आहे. सध्या कर्णधारांना नाणेफेकीपूर्वी संघांची अदलाबदल करावी लागते. नाणेफेक झाल्यानंतर ताबडतोब संघांची देवाणघेवाण करण्यासाठी हे बदलण्यात आले आहे, ज्यामुळे संघ प्रथम फलंदाजी करीत आहेत की गोलंदाजी करीत आहेत यावर अवलंबून सर्वोत्तम अंतिम एकादश निवडू शकतात. हे संघांना प्रभावशाली खेळाडूची योजना आखण्यास मदत करेल.
Powered By Sangraha 9.0