‘वोस्ट्रो’ व आंतरराष्ट्रीय व्यापार सुलभीकरण

    दिनांक :22-Mar-2023
Total Views |
इतस्तत:
डॉ. राजू घनश्याम श्रीरामे
(Vostro Accounts) सध्या रशिया-युक्रेन युद्धाच्या  पृष्ठभूमीवर भारताने आपला आंतरराष्ट्रीय व्यापार व काही आंतरराष्ट्रीय मानके नव्याने स्थापित केली. त्यात आंतरराष्ट्रीय चलन असलेल्या डॉलरचे भाव सध्या वधारलेले आहेत. अशावेळी दोन वेगवेगळ्या देशांच्या आर्थिक व्यापारविषयक व्यवहारात मात्र तिसर्‍या देशाच्या म्हणजेच यूएस डॉलर्सचा काहीही संबंध नसताना दोन भिन्न चलनाचा स्वीकार करणार्‍या देशांना मात्र नाईलाजाने राखीव चलन असलेल्या डॉलर्सचा स्वीकार करावा लागतो. याचा भुर्दंड हा दोन्ही देशांना भोगावा लागत असल्यामुळे आता ‘वोस्ट्रो’ या नवीन चलन पद्धतीचा स्वीकार करावा लागला. यामुळे ही चलनाच्या देवाणघेवाणीची आंतरराष्ट्रीय समस्या अधिक सुलभ होऊ शकेल. यावर नवीन पर्याय तयार झाले असून याला भारतीय रिझर्व्ह बँकेने मान्यता दिली असल्याचे दिसून येत असून याचे आंतरराष्ट्रीय लाभ दोन्ही देशाला होत आहेत.
 
hj  
 
 
‘वोस्ट्रो’ खाते (Vostro Accounts) काय आहे? (Vostro Accounts) भारत-रशिया व्यापार ते कसे सुलभ करू शकते? हे अभ्यासण्यासाठी थोडेसे या नवीन पद्धतीच्या मुळाशी जाऊन त्याचे मूळ तत्त्व कसे काम करते, हे पाहावे लागणार आहे. रशियासोबत रुपयात व्यापार सुलभ करण्यासाठी भारताने नऊ बँकांना नुकतेच ‘वोस्ट्रो’ खाती उघडण्यास मान्यता दिलेली आहे. वोस्ट्रो खाती ही बँक दुसर्‍या, अनेकदा परदेशी बँकेच्या वतीने धारण केलेली खाती आहेत. ही खाती म्हणजेच करस्पॉन्डंट बँकिंगचा एक महत्त्वाचा भाग आहे. जुलै 2022 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने आंतरराष्ट्रीय व्यापार सेटलमेंट्स करण्यासाठी रुपयांमध्ये एक नवीन यंत्रणा अस्तित्वात आणली; ज्याचा उद्देश देशी चलनातील आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या मौलिक प्रकि‘येला प्रोत्साहन देणे हा राहिलेला आहे. देशाच्या बँकिंग क्षेत्रात 2014 पासून नवनवीन बदलांना सुरुवात झालेली असून त्याचे प्रतिबिंब आंतरराष्ट्रीय पातळीवरही दिसून आले. या बदलाच्या प्रकि‘येचे पडसादसुद्धा उमटलेले दिसून आले आहेत. आता वोस्ट्रो खात्यातील बदलाच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय निर्यात आणि आयात प्रकि‘या अधिक सुलभ होत असून त्याचे वैश्विक लाभ दोन्ही देशांना होताना दिसून येतात.
देशी चलन आणि आंतरराष्ट्रीय व्यवहार
(Vostro Accounts) जेव्हा देश आंतरराष्ट्रीय व्यापार प्रक्रियेद्वारे वस्तू आणि सेवांची आयात आणि निर्यात करतात तेव्हा त्यांना परकीय चलनात देयके ‘सेटल’ होत नाहीत. यासाठी सर्व देशांना स्वीकार्य असलेले चलन म्हणजे यूएस डॉलर हेच असून हे जगातील राखीव चलन असल्याने, जगातील बहुतांश देशांचा आंतराष्ट्रीय व्यापार हा यूएस डॉलरमध्ये होताना दिसून येतो. उदाहरणार्थ जर एखाद्या भारतीय खरेदीदाराने जर्मनीतील विक्रेत्याशी आंतरराष्ट्रीय व्यापाराद्वारे व्यवहार केला, तर भारतीय खरेदीदाराला प्रथम त्याचे रुपये यूएस डॉलरमध्ये रूपांतरित करावे लागतील आणि त्यानंतर ती देणी त्या जर्मन विक्रेत्याला डॉलर्सच्या रूपात मिळतील; जे नंतर पुन्हा युरोमध्ये रूपांतरित केले जातात. येथे सहभागी दोन्ही पक्षांना म्हणजेच भारतीय व जर्मन व्यापार्‍याला चलनाच्या रूपांतरणाचा खर्च करावा लागला. त्यात दोन्ही पक्षांचे नुकसान झालेले दिसून येत आहे. चलनाच्या रूपांतरणाचा हा खर्च दोन्ही देशांना स्वीकारावा लागतो. अशावेळी करण्यात आलेल्या रूपांतरणाच्या खर्चाच्या धोक्यासोबतच त्याला परकीय चलन दर चढउताराचा धोका सहन करावा लागतो. आता मात्र वोस्ट्रो खात्याच्या मदतीने, या दोन्ही व्यापार्‍यांना यूएस डॉलर भरण्याऐवजी आणि प्राप्त करण्याऐवजी, प्रतिपक्षाचे रुपे वोस्ट्रो खाते असल्यास त्यांच्या देयकांचे बीजक भारतीय रुपयांमध्ये केले जाईल. यामुळे ही प्रक्रिया अधिक सुलभ होऊ शकेल.
वोस्ट्रो खाते म्हणजे काय?
रुपी वोस्ट्रो खाती ही दुसरी-तिसरी कुठलीही वेगळी प्रक्रिया नसून भारतीय बँकेत विदेशी संस्थांचे होल्डिंग भारतीय रुपयात ठेवले जात असतात. जेव्हा एखाद्या भारतीय आयातदाराला परदेशी व्यापार्‍याला रुपयात पेमेंट करायचे असेल, तेव्हा ती रक्कम या वोस्ट्रो खात्यात जमा केली जाईल आणि जेव्हा एखाद्या भारतीय निर्यातदाराला वस्तू किंवा सेवा पुरवण्यासाठी पैसे द्यावे लागतील, तेव्हा या वोस्ट्रो खातेमधून ती देयकांची रक्कम कापली जाईल. यानंतर निर्यातदाराच्या खात्यात सदर रक्कम जमा केली जाईल. यात भागीदार देशाची बँक उदा. जर्मन बँका विशेष रुपी वोस्ट्रो खाते उघडण्यासाठी भारतातील अधिकृत डीलर्स (एडी) बँकेशी संपर्क साधू शकतात. त्यानंतर एडी बँक व्यवस्थेच्या तपशिलांसह आरबीआयकडून मंजुरी मागू शकेल. आरबीआयने मंजुरी दिल्यानंतर जर्मन बँकेद्वारे भारतीय एडी बँकेत विशेष रुपे वोस्ट्रो खाते उघडले जाईल. यानंतरची प्रकि‘या म्हणजे व्यापार करारानंतर पक्षांमध्ये भारतीय चलनात आयएनआरमध्ये व्यापार सुरू होईल. अशावेळी दोन व्यापारी भागीदार देशांच्या चलनांमधील विनिमय दर हा प्रत्यक्ष बाजाराद्वारे निर्धारित केला जाऊ शकतो. अशाप्रकारे हा तोडगा काढला जाऊ शकतो.
वोस्ट्रो खाते समजण्यासाठी आवश्यक साधन प्रक्रिया 
(Vostro Accounts) आज अनेक बँका ग्राहकांच्या मनामध्ये विश्वासाचे नाते निर्माण करीत असून याचे लाभ ग्राहकांना सहज प्राप्त होत आहेत. आंतराष्ट्रीय व्यापाराला सहकार्य करणार्‍या या बँका ग्राहकांचा विश्वास संपादन करून पारदर्शीपणे काम करतात.
वोस्ट्रोची निर्मिती का आवश्यक आहे? भारतातून होणार्‍या निर्यातीवर भर देऊन जागतिक व्यापाराच्या वाढीला चालना देण्यासाठी आणि भारतीय चलन रुपयामध्ये (आयएनआर) जागतिक व्यापारी समुदायाच्या वाढत्या हिताला पाठिंबा देण्यासाठी, इनव्हॉईसिंग, पेमेंट आणि निर्यात/आयातीच्या सेटलमेंटसाठी अतिरिक्त व्यवस्था ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. अशा प्रकारे या व्यवस्थेंतर्गत सर्व निर्यात आणि आयात रुपयामध्ये (आयएनआर) डिनॉमिनेटेड आणि इनव्हॉईस केली जाऊ शकतात. दोन व्यापारी भागीदार देशांच्या चलनांमधला विनिमय दर चालू बाजार दराने ठरवला जाऊ शकतो. यात सेटलमेंट या व्यवस्थेंतर्गत व्यापार व्यवहारांचा निपटारा आयएनआरमध्ये होईल. त्यानुसार कोणत्याही देशासोबत व्यापार व्यवहारांच्या सेटलमेंटसाठी, भारतातील एडी बँक भागीदार व्यापार देशाच्या करस्पॉन्डंट बँकेचे विशेष रुपी वोस्ट्रो खाती उघडू शकतात, याकडे विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. या व्यवस्थेद्वारे आंतरराष्ट्रीय व्यापार व्यवहारांची पूर्तता करण्यासाठी या यंत्रणेद्वारे आयात करणारे भारतीय आयातदार आयएनआरमध्ये पेमेंट करतील; जे परदेशातील विक‘ेत्या/पुरवठादाराकडून वस्तू किंवा सेवांच्या पुरवठ्यासाठीच्या बीजकांच्या विरुद्ध भागीदार देशाच्या संबंधित बँकेच्या विशेष वोस्ट्रो खात्यात जमा केले जातील. या यंत्रणेद्वारे वस्तू आणि सेवांची निर्यात करणार्‍या भारतीय निर्यातदारांना, भागीदार देशाच्या प्रतिनिधी बँकेच्या नियुक्त विशेष वोस्ट्रो खात्यातील शिल्लक रकमेतून निर्यातीची रक्कम रुपयात दिली जाईल. सप्टेंबर 2022 मध्ये आरबीआयने सार्वजनिक क्षेत्रातील यूसीओ बँकेला रशियाच्या ‘गॅझप्रॉम’ बँकेसाठी विशेष रुपे व्होस्ट्रो खाते उघडण्याची परवानगी दिली. हे रशियामधून आयातीसाठी देयके रुपयांमध्ये करणे आणि त्या खात्यात जमा करणे सक्षम करण्यासाठी होते. त्याच वोस्ट्रो खात्यात जमा केलेले पैसे, त्या बदल्यात, भारतीय निर्यातदारांना रशियाला रुपयात पैसे देण्यासाठी डेबिट केले जाऊ शकतात. यूसीओ बँकेव्यतिरिक्त दोन रशियन मालकीच्या बँका एसबीईआर बँक आणि व्हीटीबी बँक - यांनी दिल्लीतील त्यांच्या संबंधित शाखांमध्ये विशेष वोस्ट्रो खाती उघडली आहेत. जर दोन देशांमधील व्यापाराची देयके रुपयात झाली, तर भारताचे डॉलर अवलंबित्व कमी होईल, यात कोणतीही शंका नाही. यामुळे परकीय चलन साठा आणि त्याच्यावरील अवलंबित्वदेखील कमी होईल.
आरबीआयच्या या निर्णयामुळे वस्तूंच्या आयातीच्या किमती कमी करून भारताची वाढती व्यापार तूट किरकोळ रुपयांनी का असेना कमी होऊ शकते.
 
 
भारत सरकारच्या केंद्रीय अधिकोषांद्वारे मार्च 2022 महिन्याच्या सुरुवातीला, सरकारने परकीय व्यापार धोरणात (एनटीपी) सुधारणा केली आहे; जेणेकरून व्यापार्‍यांना रुपयात पेमेंट सेटल झाल्यास निर्यात फायद्यांचा दावा करता येईल. आतापर्यंत परकीय चलनात व्यापार स्थिरावल्यावरच निर्यात प्रोत्साहन मिळत असे. ट्रेड प्रमोशन बॉडी फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन्सच्या (एफआयईओ) अभ्यासानुसार, एकदा रुपया सेटलमेंट यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर रशियाला भारताची शिपमेंट आणखी पाच अब्ज डॉलर्सने वाढू शकते. याचा लाभ दोन्ही देशांना होऊ शकेल, असे तूर्तास वाटत असून इतरही देशांसोबत असे झाल्यास भविष्यात यूएस डॉलर्सला भारतीय रुपया एक सक्षम पर्याय होऊ शकेल, असे वाटत आहे.