केव्हिन डी ब्सुयनकडे बेल्जियम संघाची धुरा

    दिनांक :22-Mar-2023
Total Views |
ब्रुसेल्स, 
एडन हॅझार्डच्या निवृत्तीनंतर मॅन्चेस्टर सिटीचा स्टार खेळाडू (Kevin de Basuin) केव्हिन डी ब्रुयन याची बेल्जियमच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. बेल्जियमच्या संघात अनेक बदल झाले असून 32 वर्षीय एडन हॅझार्डने आश्चर्यकारकपणे निवृत्ती जाहीर केली, तर रॉबर्टो मार्टिनेझ संघाच्या बाहेर झाला आहे. 2018 च्या विश्वचषकात बेल्जियम विजेतेपदाचा प्रबळ दावेदार होता, परंतु उपांत्य फेरीत विजेत्या फ्रान्सकडून पराभव पत्करावा लागला होता. तसेच 2022 च्या विश्वचषक स्पर्धेत अपेक्षा उंचावल्या होत्या, परंतु पुन्हा एकदा बेल्जियमचे बाद फेरी गाठण्यापूर्वीच आव्हान संपुष्टात आले.
 
Kevin de Basuin
 
राष्ट्रीय संघाचा कर्णधार होणे हा अभिमानाचा क्षण आहे. मी बर्‍याच काळापासून फुटबॉलपटू म्हणून बेल्जियमचे प्रतिनिधित्व करीत आहे. अशा प्रकारे प्रतिनिधित्व करणे हा सन्मान आहे. मी ही भूमिका चांगल्या प्रकारे पार पाडू शकेन, असा विश्वास केव्हिन डी ब्रुयनने व्यक्त केला. यापूर्वी (Kevin de Basuin) डी ब्रुयनने काही काळ बेल्जियम संघाचा कर्णधार म्हणून जबाबदारी पार पाडली होती. कर्णधार म्हणून त्याने 2022 विश्वचषक स्पर्धेत क्रोएशियाविरुद्ध अंतिम गट साखळी सामना खेळला होता. केव्हिन डी ब्रुयनने आतापर्यंत देशासाठी 97 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून यात एकूण 25 गोल केले आहेत.