मेसूत ओझिल फुटबॉलमधून निवृत्त

    दिनांक :22-Mar-2023
Total Views |
बर्लिन, 
जर्मनीचा विश्वचषक विजेत्या संघाचा स्टार खेळाडू (Mesut Ozil) मेसूत ओझिलने बुधवारी वयाच्या 34 व्या वर्षी फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली. रियल माद्रिद व आर्सेनलचा माजी खेळाडू 2014 मध्ये ब्राझीलमध्ये विश्वचषक जिंकणार्‍या जर्मनीच्या संघाचा प्रमुख सदस्य होता. जर्मनीमध्ये स्थलांतरितांच्या वाढत्या ओघामुळे राजकीय वाद उफाळला. त्यामुळे मेसूतला सतत वंशद्वेषाचा व अनादारचा सामना करावा लागतो. या सर्व परिस्थितीला कंटाळून मेसूतने बुधवारी फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली.
 
Mesut Ozil
 
मला जवळपास 17 वर्षांपासून एक व्यावसायिक फुटबॉल खेळाडू होण्याचा बहुमान मिळाला आहे व मला मिळालेल्या संधीबद्दल आश्चर्यकारकपणे आभारी आहे, असे ओझिल म्हणाला. (Mesut Ozil) मेसूत अलीकडे तुर्कीच्या इस्तंबूल बासाकसेहिरकडून खेळला आहे. ओझिलने क्लब आणि देशासाठी 645 सामने खेळले असून त्याने 114 गोल केले आणि 222 सहाय्य केले.