पोलिस शिपाई (चालक) पदासाठी रविवारी लेखी परीक्षा

22 Mar 2023 19:28:44
वर्धा, 
Police Constable : पोलिस शिपाई भरती प्रक्रियेमध्ये पोलिस शिपाई (चालक) पदासाठी पोलिस अधीक्षक वर्धा या घटकात लेखी परीक्षेस पात्र ठरलेल्या 283 उमेदवारांची लेखी परीक्षा रविवार 26 रोजी सकाळी 8.30 ते 10 वाजता दरम्यान दत्ता मेघे हायर एज्यूकेशन अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट एक्झामिनेशन हॉल, सावंगी मेघे वर्धा येथे घेण्यात येणार आहे.
 
Police Constable
 
पोलिस शिपाई (चालक) पदासाठी लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र हे महाआयटी विभागामार्फत आभासी पद्धतीने डाऊनलोड करण्यास उपलब्ध आहे. उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर 26 रोजी सकाळी 6.30 वाजता लेखी परीक्षेसाठी हजर राहावे, असे आवाहन पोलिस उपअधीक्षक निलेश ब्राह्मणे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून केले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0