तभा वृत्तसेवा
वर्धा,
Property mortgaged : बँकेकडे गहाण असलेल्या मालमत्तांमधून दोन मालमत्ता बँक व्यवस्थापनाला विश्वासात न घेता तसेच न विचारता 70.25 लाखांची मालमत्ता परस्पर विकून बँकेची फसवणूक केली. याप्रकरणी शाखा व्यवस्थापकाच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी काकडे दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
कैलास काकडे व त्यांची पत्नी छाया यांचे 11 फेब्रुवारी 2012 मध्ये इंडियन बँकेत 1 कोटी रुपयांचे सीसी लोन मंजूर केले. त्यांनी लिमिट वाढवून 4.50 कोटींची उचल केली. कर्जदार कैलास काकडे याने त्यांच्याजवळील मालमत्ता बँकेकडे ठेवून कर्जाची व्याज रक्कम 2020 पर्यंत नियमित भरली. त्यानंतर त्यांनी कर्ज व व्याज भरले नाही. कर्जाची परतफेड न केल्याने त्यांची मालमत्ता विक्रीला काढण्याची नोटीस दिली होती. त्याच्या एकूण 7 मालमत्तांपैकी नागपूर येथील मालमत्तेचे विक्रीपत्र बँकेत मिळून आले नाही. तसेच मौजा पिपरी मेघे येथे मालमत्ताही परस्पर विक्री केल्याचे समजले. कर्जदार कैलास काकडे याने कर्जाची परतफेड न करता दोन्ही मालमत्ता परस्पर विकून बँकेची 70.25 लाखांची फसवणूक केली. याप्रकरणी तक्रारीनंतर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.