जलपुनर्भरणाची गरज ओळखा!

    दिनांक :22-Mar-2023
Total Views |
वेध...
 
नीलेश जोशी 
जल, जमीन आणि जंगल यांच्या hydration समतोलाचा विचार न करता केवळ भौतिक उन्नतीसाठी या तीनही संसाधनांना ओरबाडणार्‍या मानवासमोर आता प्रत्येक दिवशी नवनवीन समस्या उभी राहते आहे. स्वाभाविकच समस्या निर्माण झाली की, त्याच्या उपाययोजनांची चिंता, चर्चा सुरू होते. मानवी जीवन सुखकर व्हावे म्हणून भौतिक प्रगतीचे टप्पे गाठत असतानाच नैसर्गिक दैवी साधन संपत्तीवर त्याचा विपरीत परिणाम होणार नाही, याची काळजी घेण्याची आवश्यकता वेळोवेळी अधोरेखित झाली आहे. प्रश्न उभे राहिले की, त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञ त्याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करतात आणि मग पर्यावरणाचे संवर्धन, संरक्षण आवश्यक असल्याचे एकमत सर्वांचेच होते; त्यातूनच मग विविध जागतिक दिन साजरे होतात. या दिनानिमित्त संबंधित बाबींची सकारात्मक चर्चा, उपाययोजना याचे चिंतन केले जाते.
 
 
 
gyht
 
 
21 मार्च रोजी जागतिक वन दिन, 22 मार्च जागतिक जल दिन तर 23 मार्च रोजी जागतिक हवामान दिन साजरा केला जातो. वन, जल आणि हवामान hydration या तीनही बाबी आनंददायी मानवी जीवनासाठी आवश्यक आहेत. पण, भौतिकतेच्या अतिरेकामुळे निसर्गाने दिलेले हे वरदान संकटात असल्याचे चित्र आहे. मुळात अन्नधान्यासाठी शेती आणि शेतीच्या सिंचनासाठी पाणी अशी आवश्यकता निर्माण झाली. सिंचनासाठी लागणार्‍या पाण्याचा उपसा भूगर्भ जलसाठ्यातून होतो. त्याचवेळी भूगर्भ जलाचे पुनर्भरण किती प‘माणात होते हा मोठा प्रश्न आहे. तर, दुसरीकडे गावोगावी असलेले नैसर्गिक जलस्रोत आटल्याचे दिसून येते. एवढेच नव्हे तर वाढत्या लोकसं‘येमुळे जमिनीला अधिक महत्त्व प्राप्त झाले. एका सर्वेक्षणानुसार गावागावांतील नैसर्गिक जलस्रोतांच्या जवळपास 70 टक्के जमिनींवर अतिक्रमण झाल्याचे म्हटले आहे. भूगर्भातील पाण्याचे उपशाच्या प्रमाणात न होणारे पुनर्भरण आणि नैसर्गिक जलस्रोतांवर झालेले अतिक‘मण यातून सिंचनासाठी आणि पिण्यासाठी लागणार्‍या पाण्याचा दुष्काळ निर्माण झाल्याचे दिसून येते. पाण्याच्या समस्यांवर चिंता, चिंतन आणि उपाययोजना व्हावी म्हणून 22 मार्च हा दिवस जागतिक जल दिन म्हणून साजरा करण्याचे संयुक्त राष्ट्र संघाने 1992 साली निश्चित केले. तेव्हापासून 22 मार्च हा जल दिन म्हणून साजरा होतो. पण केवळ उक्तीतून या प्रश्नाचे समाधान होईल का? जलसंवर्धनाची सुरुवात कृतीतून होणे आवश्यक आहे. अन्यथा ‘पालथ्या घड्यावर पाणी’ असेच म्हणावे लागेल.
 
 
पाण्याच्या hydration समस्येसोबतच हवामान बदलाची समस्या समोर उभी आहे. हवामान बदलाचे परिणाम दिसायला लागले आहेत. तज्ज्ञांचे मते तापमानाचे चक‘ बदलत आहे. केवळ उच्चतम नव्हे तर न्यूनतम तापमानातही घट झाल्याचे निरीक्षण गत काही वर्षांपासून नोंदविले गेले आहे. या सर्व समस्यांबाबत ‘टेरी’ नावाच्या संस्थेने 2014 साली एक अहवाल महाराष्ट्र शासनाला दिला आहे. त्यात अनेक बाबींचा उलगडा टेरीने केला. त्यात नैसर्गिक पद्धतीने जलसंधारण केले जावे, भूजल पातळी मर्यादेत ठेवण्यासाठी जलपुर्नभरणाची सोय आदींसह विविध उपाययोजना सांगितल्या आहेत. सोबतच हवामानाच्या बदलाची भयावहता नमूद केली आहे. या अहवालातील योग्य सूचना प्रत्यक्षात अंमलात याव्यात, अशी या क्षेत्रात काम करणार्‍या अनेकांची इच्छा आहे.
मुळात समस्याचा केवळ बाऊ करून समस्येचे निराकरण होणार नाही. केवळ कागदावरील प्रबंधांनी किंवा योजनांनी प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी प्रत्यक्ष कृती आणि दीर्घकाळाचे नियोजन करण्याची गरज आहे. एकेकाळी पाण्याचा धर्म समजणारी व्यक्ती, आज बाटली बंद पाणी विकते आहे. उद्या यापेक्षाही भयंकर स्थिती उद्भवून पाण्याचा खर्च परवडत नाही, असे म्हणण्याची वेळ येईल. तेव्हा वेळीच सावध होऊन आवश्यक उपाययोजनांची कृती करण्याची आवश्यकता आहे.
9422862484
-------