चैत्र पाडव्याच्या प्रभात समयी बुलढाण्यात सप्तसुरांची मैफिल

    दिनांक :22-Mar-2023
Total Views |
बुलडाणा, 
गुढीपाडव्याच्या सणाला मराठी Chaitra Padava नववर्षाच्या स्वागतासाठी मराठी भावगीते,भक्तीगीते, अभंग व चित्रपट गितसंगीताच्या प्रभाती सुर नभी रंगती या दर्जेदार कार्यक्रमाच्या सादरीकरणास बुलडाणेकर रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वसंतलक्ष्मी एज्युकेशन अँड मल्टीपरपज फाऊंडेशन, बुलडाणा यांचे माध्यमातून एडेड हायस्कूल बुलडाणा च्या प्रांगणात 22 मार्च रोजी भल्या पहाटे 5.30 वाजता या मैफिलीला सुरूवात होऊन गायक कलावंत करणसिंग राजपूत, वैशाली आराख, चंद्रशेखर जोशी यांनी विविध प्रकारची गाणी सादर केलीत. गाण्यांना कुंदन आराख (सिंथेसायझर), अतिश राजपूत (तबला - ढोलकी), अमोल दुतंडे (ऑक्टोपॅड) यांनी सुरेल साथसंगत केली.
 
 

fyrt  
 
 
चंद्रशेखर जोशी यांचे बहारदार निवेदन, Chaitra Padava लक्ष्मण राजपूत यांची सुस्वर बासरी यासह रसिक श्रोत्यांच्या आग्रहाने रणजितसिंग राजपूत यांनी सादर केलेली तू धुक्यासारखी मी उन्हासारखा ही गझल व शाहीर सज्जनसिंग राजपूत, अजयसिंग राजपूत, विक्रांतसिंग राजपूत, धनंजय चाफेकर यांनी सादर केलेल्या महाराष्ट्र गीताने रसिकांची मने जिंकली. कार्यक्रमात सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कानडा राजा पंढरीचा, कुश लव रामायण गाती, केव्हा तरी पहाटे, दही दूध लोणी, वासुदेव गीत, बाजे रे मुरलिया बाजे, पाहिले न मी तुला, हासणे हे जरी स्वभावात आहे, अधिर मन झाले, तुला पाहते रे, माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पाणी जातं व अखेरचा हा तुला दंडवत आदी गाण्यांनी उत्तरोत्तर चैत्र पहाट पाडव्याच्या मैफिलीस रंगत आली.
प्रारंभी डॉ. शोण चिंचोले, डॉ.सागर जोशी, डॉ.गजेंद्र निकम, सुजाता कुल्ली व इतर मान्यवरांच्या हस्ते माता सरस्वती प्रतिमा पूजन होऊन आयोजनास सहकार्य करणारे बुलडाणा एज्युकेशन सोसायटी चे डॉ.प्रमोद व सौ.शोभा देशपांडे तसेच माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ व इतर मान्यवरांचा समयोचीत सत्कार करण्यात आला. आयोजनाची धुरा तुषार काचकुरे व पवन बाबरेकर यांनी सांभाळली.
 
 
यावेळी उपस्थित रसिकांमध्ये सौ.अंजली परांजपे, प्रा.मृणालिनी सपकाळ, रविकिरण टाकळकर, अरविंद पवार, राहुल चव्हाण, डॉ.प्रशांत ढोरे, डॉ. गोफणे, डॉ.दुर्गासिंग जाधव, डॉ.वैशाली निकम, पवन सोनारे, सौ.निता जोशी, सौ.ज्योती पाटील, प्रा. आखाडे, अण्णा धारकर, उमेश अग्रवाल, सचिन खाकरे, राजेश वैराळकर, विजय सोनोने, शशिकांत इंगळे, जयंत दलाल, गणेश राणे, मयूर परमार, अभिलाष चौबे यांचेसह अनेक मान्यवर रसिकांची उपस्थिती होती. आभार प्रदर्शन आनंद संचेती यांनी केले.