वरुण आणि जान्हवीचा 'बवाल' ६ला थिएटरमध्ये!

22 Mar 2023 14:05:31
मुंबई, 
वरुण धवन आणि जान्हवी कपूरचा 'Bawal' in theater चित्रपट 'बवाल' लवकरच रिलीज होणार आहे. वरुण आणि जान्हवीसाठी हा चित्रपट खूप खास आहे कारण ते पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. त्याचबरोबर चाहतेही या चित्रपटाबाबत खूप उत्सुक आहेत. छिछोरे सारखे यशस्वी चित्रपट देणारे साजिद नाडियादवाला 'बावल' चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करणार आहे. बवाल रिलीजच्या तारखेबद्दल, निर्मात्यांनी ट्विटरवर एका पोस्टमध्ये लिहिले की, 'राष्ट्रीय पुरस्कार विजेते साजिद नाडियादवाला आणि नितेश तिवारी बवालसोबत परत आले आहेत. ६ ऑक्टोबर २०२३ रोजी  रिलीज होणार आहे. 
 
 
uy  
 
यापूर्वी हा चित्रपट 7 एप्रिल 2023 रोजी 'Bawal' in theater रिलीज होणार होता, परंतु नंतर त्याचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले. हा चित्रपट वरुण धवनच्या कारकिर्दीतील आतापर्यंतचा सर्वात महागडा चित्रपट असल्याचे बोलले जात आहे. 'बवाल'ची निर्मिती साजिद नाडियादवाला यांनी ग्रॅंडसन बॅनरखाली केली आहे. बवाल ही एक प्रेमकथा असल्याचे बोलले जात आहे. या चित्रपटाचे शूटिंग वेगवेगळ्या ठिकाणी झाले आहे. पॅरिस, बर्लिन, पोलंड, अॅमस्टरडॅम, क्राको, वॉर्सा तसेच भारतातही याचे चित्रीकरण झाले आहे. या चित्रपटात वरुण आणि जान्हवीची नवीन जोडी पहिल्यांदाच एकमेकांसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. 
Powered By Sangraha 9.0